अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात रेल येथे आगळा वेगळा लग्न सोहळा दरवर्षी आयोजित केल्या जाते. तो सोहळा म्हणजे महादेव आणि माता पार्वती यांचा या सोहळ्याला पंचक्रोशोतील आदिवशी समाज एकत्र येवून मोठ्या उत्सहात हा सोहळा पार पाडल्या जातो. आपल्या सामान्य लग्नाप्रमाणेच सर्व विधी करून शेवट आलेल्या पाहुण्यांना संस्थान कडून जेवणाची व्यवस्था केली जाते.
सालाबाद प्रमाणे यंदाही वऱ्हाड प्रांता मधील आदिवासी कोळी महादेव बांधवांचे आराध्य दैवत देवाधिदेव महादेव व हिमकण्या आदिशक्ती माता पार्वती यांचा लग्न सोहळा आदिवासी पारंपारिक, चालीरीती नुसार अत्यंत उत्साहात व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थिती मध्ये दि. १६/०४/२०२४ मंगळवारी श्री. रेलेश्वर महादेव संस्थान रेल ता.अकोट जी.अकोला या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्व भक्तांनी या नयनरम्य सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री.सुधाकरराव घुगरे अध्यक्ष, श्री.रेलेश्र्वर महादेव संस्थान रेल यांनी केले आहे.