Sunday, December 22, 2024
Homeराज्यAkola Loksabha | आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या प्रचारार्थ जेष्ठ काँग्रेस...

Akola Loksabha | आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या प्रचारार्थ जेष्ठ काँग्रेस नेते खा.मुकुल वासनिक उद्या अकोल्यात…


Akola Loksabha- काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय काशिनाथ पाटील यांचा अकोट पासून तर रिसोड पर्यंत झंजावाती प्रचार सुरू असून या प्रचारात मतदारांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत प्रचारात जोमाने उडी घेतली आहे. काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते आपले प्रचार अभियान ग्रामीण ते शहरी भागात जोमाने राबवित आहेत.काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, ज्येष्ठ काँग्रेस नेते, खा.मुकुल वासनिक हे उद्या शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यात येत असून ते डॉ अभय पाटील यांचा प्रचार करणार आहेत. मुकुल वासनिक यांच्या आगमनाने अकोल्यातील वातावरण काँग्रेसमय होणार आहे.

शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी 11-30 वाजता हेलिकॉप्टर द्वारे खा. मुकुल वासनिक यांचे पातूर येथे आगमन होणार आहे. डॉ अभय पाटील समवेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत पातुर परिसरात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी 2-30 वाजता त्यांचे अकोला महानगरात आगमन होणार असून महानगरातील विविध परिसरात खा. मुकुल वासनिक प्रचार अभियान राबवणार असून महानगरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समवेत त्यांच्या प्रचार सभा ठिकठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत.

या प्रचार दौऱ्यात काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,आम आदमी पार्टी ,भीमशक्ती , शेतकरी कामगार पक्ष आदीं महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: