Akola Loksabha : अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराचा वाढता ज्वर लक्षात घेता महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे सध्याचे अकोला लोकसभेचे चित्र आहे. इतरही पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे, मात्र काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभय पाटील यांच्या नावाची चर्चा फार जोरात असल्याचे नागरिकांकडून समजते. डॉ.अभय पाटील हे गेल्या पाच वर्षापासून या मतदार संघात प्रचंड मेहनत घेत आहे त्यामुळे त्यांच नाव प्रत्येकाच्या तोंडावर आहे. जिल्ह्यातील एक नामांकित डॉ. ते समाजसेवक अशी त्यांची ओळख आहे.
कोण आहेत अभय पाटील?
डॉ. अभय काशिनाथ पाटील हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. M.B.B.S. Orthopedic Surgeon असा त्याचा शैक्षणिक प्रवास आहे. गेल्या 30 वर्षापासून अकोल्यात ऑर्थोपेडीक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. अकोल्यातील विघ्नहर्ता क्रिटीकल केअरचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. राजकीय जबाबदारीचा विचार केला तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते जनरल सेक्रेटरी होते.
अभय पाटील यांची कारकिर्द कशी आहे? कोणते उपक्रम राबवले?
अभय पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत 50 हजार शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. एम.आर.आय. सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक व लायेंन्स क्लॅबचे माजी अध्यक्ष आहेत. अकोला आणि वाशिममध्ये मराठा क्रांती मोर्चा संयोजन त्यांनी केले आहे. 150 खाटांचे मल्टी स्पेशालिटी ऑयकॉन हॉस्पिटल सुरु केले. दरवर्षी भगतसिंग जयंतीला त्यांच्याकडून रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. 1000 ते 1200 बॉटल्यांची व्यवस्था केली जाते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देण्यासाठी प्रेरणादायी व्याख्याने देतात. सालासर बालाजी मंदीर व गणेश चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापकी अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अकोला जिल्ह्यात पासपोर्ट शिबिर तयार केले. लायब्ररी आणि पुस्तकांचे वितरण त्यांनी केले होते.
गुन्हेगारांच्या पुनर्वसनावर त्यांनी काम केलय. अकोला वेद आणि संस्कार स्कूलचे संस्थापक सदस्य आहेत. वाशिम जिल्ह्यातील अनेक मंदिरे, सोनखास, पंधरा जीम आखाडा आणि संस्कार केंद्राचे व्यवस्थापन केले. सुमारे 10 ते 15 हजार तरुणांची शिव जयंती आणि संभाजी महाराज जयंती आयोजित केली. बाळापूर व सोनखास येथे ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रेरणेसाठी शाळा स्थापना केल्या. रंग पिकर्ससाठी शाळा चालवल्या. मेडिकल चॅम्प आयोजित केले आणि रोजगार शिबिर आयोजित केले आहेत.
आपल्या स्वभावाने लोकांना जवळ करणारा समाजसेवक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. त्यामुळं त्यांना उमेदवारी दिल्याने लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यांची मतदार संघातील लोकांसाठी काम करण्याची प्रचंड इच्छा शक्ती आहे. लोकांना वाटतय की, 20 वर्षांनंतर चांगला चेहरा मिळालाय. पर्याय लोकांना भेटलाय. असे मतदारांचे म्हणणे आहे.