Akola Loksabha : अकोला लोकसभा मतदार संघ हा भाजपचा गड आहे येथे गेल्या 4 वेळेस लोकसभेत भाजपच वर्चस्व राहिले आहे, अकोला लोकसभेचे लोकप्रिय खासदार संजय धोत्रे यांची तब्बेत बरी नसल्याने यावेळी त्यांच्या मुलाला अनुप धोत्रेला भाजप ची उमेदवारी मिळाली. तर अकोल्यात जिल्हा परिषदेसह पंचायत समिती मध्ये सत्ता असलेल्या वंचित बहुजन आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी फिस्कटल्याने आजच महाविकास आघाडीने आपला उमेदवार डॉ. अभय पाटील यांना कॉंग्रेस कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित आघाडीने अगोदरच आपले लोकसभेचे ९ उमेदवार जाहीर केले आहेय. यामध्ये अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित आघाडीने महाविकास आघाडी सोबत युती करावी अशी आंबेडकरी जनतेची इच्छा होती मात्र घोड कुठे अडलं?ते सर्वांनाच माहिती आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडी सोबत वंचित आघाडीची अनेकदा बोलणी झाली मात्र यावर तोडगा निघाला नसल्याने अखेर आज डॉ. अभय पाटील यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळाली. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. अभय पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असे महाव्हाईस न्यूज ने आधीच भाकीत केले होत. ते आज खरे ठरले…
डॉक्टर अभय पाटील यांची जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे. ते गेल्या पाच वर्षपासून मतदार संघात सक्रीय काम करीत असल्याने त्यांचे प्रत्येक गावात कार्यकर्ते व मित्र मंडळी मोठ्या प्रमाणत आहे. त्यांच्या पाठीमागे उद्धव ठाकरे शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाठबळ व तसेच प्रत्येक गावात असणारे नातेवाईक व सोबतीला युवकांची साथ त्यामुळे त्यांची सध्याची स्थिती भक्कम मानल्या जात आहे.