Akola Loksabha : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा अकोला लोकसभा निकाल अखेर लागला. यामध्ये भाजपचे उमेदवार अनुपभाऊ धोत्रे हे ४० पेक्षा जास्त मतांनी निवडून आले. आज सकाळ पासून अकोल्यात भाजप मध्ये उत्साहाचे वातावरण होते मात्र सुरुवाती पोस्टल मतांची मोजणी सुरुवात झाली तेव्हा कॉंग्रसचे डॉ. अभय पाटील हे लीड घेत पुढे होते. तर ही लीड १५ व्या फेरी पर्यंत कायम होती. १५ व्या फेरीत त्यांच्या निकटचे प्रतिस्पर्धी व कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा 40 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव करुन, अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपकडे कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. भाजपचा गड असलेल्या विदर्भात भाजपला लागोपाठ पराभव पत्करावा भाजपमहायुती फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी 27 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती 20 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गट 11 जागांवरील आघाडीसहीत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरतोय तर भाजपा सध्या 13 जागांसहीत सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. शिंदे गट 6 जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गटाने 5 जागांवर आघाडी मिळवली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी विजयी पुर्व विदर्भात भाजपची इभ्रत राखली तर अनुप धोत्रे यांनी पश्चिमेत पक्षाची उमेद कायम ठेवली. वंचित बहुजन ‘आघाडीचे सर्वेसर्वा अँड प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून डॉ. अभय पाटील यांनी मताधिक्य मिळवून १४ व्या फेरीपर्यंत ९ हजार ९४ मताधिक्य कायम ठेवून होते. पण १५ व्या फेरीत डॉ.पाटील यांच्या मताधिक्यावर मात करून १ हजार ९३ मतांची आघाडी घेतली आणि प्रत्येक फेरीत है मताधिक्य वाढत गेले. अंतिम फेरीत भाजपाचे अनुप धोत्रे यांनी 4 लाख 53 हजार 866 मते घेत विजय खेचून आणला. अंतिम निकालात भाजपाचे अनुप धोत्रे यांना 4,53,866 तर काँग्रेस महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील यांना 4, 13,854 मते मिळाली असून वंचित आघाडी प्रकाश आंबेडकरांनी 2, 74, 823 मते पटकाविली.