Tuesday, December 24, 2024
Homeराज्यAkola Loksabha | सव्वा सात लाख मतदारांनी मतदान केले नाही...

Akola Loksabha | सव्वा सात लाख मतदारांनी मतदान केले नाही…

सौजन्य – अनंत गावंडे

Akola Loksabha – अकोला लोकसभा मतदारसंघात काल झालेल्या मतदानामध्ये जवळपास 722466 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नसल्याचे निदर्शनास आले आहे. 61.79% मतदानाची टक्केवारी आहे. सर्वात जास्त मतदानची टक्केवारी बाळापूरची 66.58 असून सर्वात कमी अकोला पश्चिमची 54.57 आहे.

लग्नाची दाट स्थित तडपते ऊन तसेच राजकारण्यां प्रती असलेली निराशा या कारणाने मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे बोलले जात आहे. रणधीर सावरकर यांच्या मतदार संघात टक्केवारी 59.36% एव्हढी असली तरी मतदार संख्या 202294 असुन ती इतर पाच मतदारसंघापेक्षा जास्त आहे.

त्या खालोखाल बाळापूरची मतदार संख्या 200170 आहे मात्र येथे 66.58 एव्हढी सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी आहे. रिसोड तिसऱ्या स्थानी असुन 62.43 टक्केवारीने 197241 एव्हढी मतदार संख्या आहे. यानंतर मुर्तीजापुर मध्ये 64.52 टक्केवारीने 193761 मतदार संख्या आहे.

अकोटात 192283 मतदारांनी मतदान केले त्याची टक्केवारी 64.02 आहे . सर्वात कमी मतदान अकोला पश्चिम मध्ये झाले असून 182599 मतदारांनी 54.87 % सरासरीने मतदान केले आहे. भाजपचे रणधीर आमदार सावरकर, हरिष पिंपळे व प्रकाश भारसाकडे यांच्या मतदार संघात झालेल्या मतदानाची आकडेवारी 588338 आहे तर अमीत झणक व नितीन देशमुख यांच्या मतदार संघात झालेल्या मतदानाची आकडेवारी 397411 आणि शर्मा व साजिद खान पठाण यांची तुल्यबळ लढत झालेल्या मतदार संघात एक लाख 82 हजार 599 सर्वात कमी 54.87 टक्केवारीने मतदान झाले आहे.

मतदार संघातील आमदारांचा प्रभावच उमेदवार निवडीसाठी कारणीभूत ठरणार आहे. हा जर निकष लावला तर सद्यस्थितीत झालेल्या मतदानावरून असा अंदाज काढता येतो की भाजपचे अनुप धोत्रे विजयी होऊ शकतात.

मात्र शिवसेने ची ची झालेली वजाबाकी गृहीत धरली तर चित्र वेगळे दिसू शकते आणि बाळापूर रिसोड अकोला पश्चिम या मतदारसंघाचा विचार केल्यास डॉक्टर अभय पाटील यांचा विजय निश्चित आहे झालेल्या मतदानामध्ये हिंदू मतदारांची टक्केवारी कमी झाल्याचा कयास आहे.

यावरून बाळासाहेब आंबेडकर ही लढतीत असू शकतात असे राजकीय तज्ञांचे मत आहे. उमेदवारांच्या समर्थकांना मतदान झालेल्या आकडेवारीने विजयाचे अंदाज लावताना निश्चितच संभ्रमात ठेवले आहे. मात्र 4 जून पर्यंत आकडेमोड करून आपलाच उमेदवार निवडून येतो, अशी मन समजावणी करून टेंशन मुक्त राहता येते यात शंका नाही.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: