पातूर – निशांत गवई
शिर्ला येथील बेपत्ता युवतीचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती या घटनेची माहिती अनुप धोत्रे यांना मिळतात त्यांनी शीर्ला येथील त्या युवतीच्या परिवारास भेट दिली पातुर तालुक्यातील शिर्ला खदान येथील किरण अर्जुन बळकार या 19 वर्षीय युवतीच्या हत्याकांडाची माहिती मिळताच अनुभव धोत्रे यांनी दोन ऑगस्ट रोजी युवतीच्या घरी जाऊन भेट दिली तसेच,
या प्रकरणी सखोल चौकशी होण्याकरिता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची माहिती अकोला पूर्वचे आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिली आहे असे बळकर कुटुंबीयांना अनुप धोत्रे यांनी सांगितले आणि प्रत्येक क्षणी भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे असे आश्वासित केले.
या वेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रमण जैन, जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह गहीलोत, जिल्हा सचिव प्रेमानंद श्रीरामे, जिल्हा सचिव चंद्रकांत अंधारे, भाजपा शहराध्यक्ष अभिजीत गहीलोत, भाजपा शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष गजानन शेंडे, भाजपा कार्यकर्ते सचिन ढोणे भाजपा तालुका सरचिटणीस राजू उगले हे होते.