Akola : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यावर अकोला येथील महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याचा गुन्हा अकोल्याच्या रामदासपेठ पोलिसात दाखल झाला आहे. लिंबाजी बारगिरे असे लिंगपिसाट गट विकास अधिकार्याचे नाव असून ते सध्या कळमनुरी येथे BDO पदावर कार्यरत आहे.
४६ वर्षीय महिला ग्रामसेविकेने दिलेल्या तक्रारीनुसार, महिला जेव्हा अकोला पंचायत समीती येथे जुलै 2022ते जुन 2023 पर्यन्त कार्यरत असतांना त्याच ठिकाणी लिंबाजी बारगिरे A BDO म्हणुन कार्यरत होते. आज लिंबाजी बारगीरे हे कळमनुरी जि हिंगोली येथे कार्यरत आहे. तेव्हापासुन त्यांनी सोबत फोन वर तसेच व्हॉटसअप वर बोलत होतो. महिला अकोला येथे कार्यरत असतांना महिलेची कार्यालयीन विभागीय चौकशी सहाय्यक गटविकास अधिकारी बार्शिटाकळी यांचे कडे सुरु आहे. काल दि14/06/24 रोजी संध्याकाळी अं. 07/30वा चे सुमारास महिला घरी हजर असतांना त्यांच्या मोबाइल वर बारगीरे यांनी फोन वरुन कारण नसतांना विचारणा केली, फोन करुन त्यांनी महिलेची सुरु असलेली विभागीय चौकशी संबंधाने बोलण्याकरीता महिलेला अकोला येथे आज दि 15/06/24रोजी सकाळी 11/00वा पर्यन्त रेल्वेस्टेशन चौक येथे बोलावीले होते.
महिलेने त्यांचेवर विश्वास ठेवुन महिला आज दुपारी अं 01/15वा चे सुमारास मी रेल्वेस्टेशन जवळील शहा हॉस्पीटल समोर येवुन उभी राहली थोडयाच वेळात BDOलिंबाजी बारगीरे तिच्या जवळ आले व महिलेला म्हणाले की चला आपण लाँज वर जावु व दोन तासात तुम्हाला मोकळे करतो असे म्हटले असता महिलेने त्यांचेसोबत लाँज वर जाण्यास नकार दिला. त्यावरुन त्यांनी महिलेला म्हटले की आपन जेवण करायला जावु असे म्हणुन महिलेला त्यांचे सोबत येण्याचे सांगीतले वरुन महिला त्यांचेसोबत पायी गेली असता त्यांनी तिला रेल्वेस्टेशन वरील आनंद रेस्टॉरंट येथे घेवुन गेले व आनंद रेस्टॉरेन्ट चे वरील मजल्यावर जेवण करण्याकरीता टेबलवर बसले असता त्यावेळी बारगीरे यांनी महिलेला म्हटले की तु मला फक्त लाँज वर दोन तास दे मी तुझे विभागीय चौकशीचे प्रकरण पुर्ण मॅनेज करून देतो.
जेवन करुन ते दोघेही खाली आले व आनंद रेस्टॉरंन्ट च्या समोर उभे असतांना BDOलिंबाजी बारगीरे यांनी महिलेला परत म्हटले की आपण माझे मित्राचे लॉज वर जावु असे म्हटले असता महिलेने प्रसंगावधान राखुन त्यांना म्हटले की आपण लॉज वर न जाता अँटो रिक्षा ने माझे मैत्रीनी कडे जावु त्यावरुन BDO लिंबाजी बारगीरे यांनी होकार देवुन त्यांनी अँटो थांबवुन आनंद रेस्टॉरंन्ट समोर ते दोघेही अँटोत बसलों व महिलेने अगोदरच अँटो वाल्याला अँटो पोलीस स्टेशन रामदारसपेठ चे समोर घेवुन चल असे सांगीतले ते दोघेही अँटोत बसुन येत असतांना BDOलिंबाजी बारगीरे यांनी अँटोत बसल्यावर त्यांनी महिलेसोबत लैंगिक चाळे केले. सदर प्रकरणी लिंबाजी बारगिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी लिंबाजी बारगिरे यांना अटक केलेली नाही.