अकोल्याचे सह आयुक्त श्री विजय लोहकरे यांची अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषद येथे बदली झाली असून आज त्यांनी चिखलदरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गट-अ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. याआधी या नगरपालिकेचा प्रभार अंजनगाव सुर्जीचे मुख्याधिकारी श्री दादाराव डोल्हारकर यांचेकडे होता. चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. लोहकरे हे आपल्या कार्यकाळात दबंग कामगिरीसाठी ओळखले जातात. सोबतच शासनाच्या विविध योजना राबवून जनतेच्या हितासाठी काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांनी मूर्तिजापूर, मोर्शी, वरुड, लोणार, पुन्हा मूर्तिजापूर येथे मुख्याधिकारी म्हणून बदली तेथून पदोन्नती होऊन वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी निवड व तेथून अकोला येथील जिल्हा सह आयुक्त (जिल्हा प्रशासन अधिकारी, गट-अ, नगर पालिका प्रशासन विभाग) पदावर नियुक्ती. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून बदली.
मूर्तिजापूर नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदी त्यांनी दोन टर्म काम केले असून कोरोना काळातील त्यांची कारकिर्द विशेष प्रभावी ठरली होती. मूर्तिजापुरातील त्यांच्या कार्यकाळात पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पीएम अवॉर्ड करिता मूर्तिजापूर नगर पालिकेची निवड झाली होती व देशातून या अवॉर्डसाठी निवड झालेल्या ८ नगरपालिकांपैकी ही राज्यातील एकमेव नगरपालिका ठरली होती. ते ज्या ठिकाणी काम करतात तेथे त्यांच्या कामाचा ठसा उमटवीतात…