प्रशिक्षणासोबतच संविधान जनजागृती करणारे संविधान मंदिर
अकोला,दि 15(संतोषकुमार गवई): जागतीक लोकशाही दिनाच्या निमित्याने राज्यातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये स्थापन केलेल्या संविधान मंदिरांचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते मुंबई येथील मुख्य सोहळ्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे
करण्यात आले.
अकोला येथील औ.प्र.संस्था (मुलींची) येथे आयोजीत कार्यक्रमात संविधान मंदीराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, खासदार अनुप धोत्रे, औ.प्र.संस्था (मुलींची) व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयंत पडगिलवार, प्राचार्य तथा प्र.जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी शरदचंद्र ठोकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
व्यवस्थापन समिती सदस्य विलास अनासाने,कांतीलाल गौरसिया,ॲड मुरलीधर इंगळे आदी उपस्थित होते.यावेळी संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले.
अकोला शहरातील विवीध औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमधेही संविधान मंदिराचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक जयंत पडगिलवार यांनी बोलताना संविधान मंदीर ही संकल्पना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यासाठी कायदा व न्यायव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणारे दालन असल्याचे सांगितले. औद्योगिक प्रशिक्षणासोबत संविधानाने दिलेले हक्क अधिकाराची जाणीव व जनजागृतीसाठी संविधान मंदीर महत्त्वाची भूमिका बजावेल असे प्रतीपादन शरदचंद्र ठोकरे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीेतेसाठी शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर,गटनिदेशक रणजित महल्ले, संचलन प्रशांत बोकाडे, जयंत गनोजे व औ.प्र.संस्था (मुलींची) येथील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.