Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | ट्राफिक अमलदार मोहम्मद अझहरची इमानदारी...मोबाईलसह पाच हजार रुपये केले परत...

अकोला | ट्राफिक अमलदार मोहम्मद अझहरची इमानदारी…मोबाईलसह पाच हजार रुपये केले परत…

अकोला ट्राफिक अमलदार मोहम्मद अझहर हे कर्तव्यावर हजर असतांना आपल्या इमानदारीचा परिचय दिला आहे. अझहर यांना सापडलेला मोबाइल व नगदी पैसे परत केलेत.

आज दिनांक 28/8/2022 (रविवार) रोजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलाचे NPC मोहम्मद अझर ब.क्र.926 हे कर्तव्यावर हजर असताना त्यांना महमूद खान रफिक खान यांनी त्यांना एक मोबाईल मिळाल्याचे सांगितले.

त्यांनी तो मोबाईल NPC मोहम्मद अझर यांच्याकडे दिला. मोबाईलच्या कव्हर मध्ये पाच हजार रुपये आणि एक एटीएम कार्ड होते. मोहम्मद अझर यांनी लगेच मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध घेऊन मोबाईल क्रिश राधेश्याम राठी यांना ट्राफिक ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल, त्यातील कव्हर मध्ये असलेले पाच हजार रुपये,एटीएम कार्ड सुपूर्द केले.

या कामासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखा,अकोलाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी मोहम्मद अझहर यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: