Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | माजलेल्या रेतीमाफीयांचा तलाठ्यावर हल्ला...हिवरखेड पोलीस ठाण्यात आठ जणांवर विविध गुन्हे...

अकोला | माजलेल्या रेतीमाफीयांचा तलाठ्यावर हल्ला…हिवरखेड पोलीस ठाण्यात आठ जणांवर विविध गुन्हे दाखल…तिघांना अटक तर ५ जण फरार…

आकोट- संजय आठवले

तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे अवैधपणे सुरू असलेले रेती उत्खनन व वहन रोखण्याकरिता कर्तव्य बजावत असलेल्या तलाठ्यावर आठ रेतीमाफीयांनी हल्ला चढवून त्याला जखमी केले आहे. तलाठ्याने पोलीस ठाणे हिवरखेड येथे या संदर्भात तक्रार दाखल केली असून त्यावरून हिवरखेड पोलिसांनी आठ रेतीमाफीयां विरुद्ध विविध गुन्हे दाखल केले आहेत. यातील तिघांना अटक करण्यात आली असून पाच जण फरार झाले आहेत. या हल्ल्याचे निमित्ताने रेतीमाफीयांची माजोरी पुन्हा एकदा उघड झाली असून ही माजोरी रोखण्याकरिता कडक धोरण आखणे अनिवार्य झाले आहे.

घटनेची हकीकत अशी आहे की, तळेगाव बुद्रुक चे तलाठी प्रतीक रवींद्र इंगळे यांना २१ नोव्हेंबर चे सायं. ५.३० वा. वाजता चे दरम्यान शिवाजीनगर तालुका तेल्हारा येथे अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून इंगळे यांनी शिवाजीनगर चे तलाठी किशोर गायकी यांच्याशी संपर्क करून त्यांचे सह ते शिवाजीनगर येथे ६.१५ वा. पोहोचले. त्यानंतर अवैध रेती वाहतूक पकडणे सोयीचे व्हावे म्हणून प्रतिक इंगळे हे शिवाजीनगर येथील काळा मारुती मंदिराजवळ थांबले. तर किशोर गायकी हे आकोट हिवरखेड मार्गावरील अडगाव फाटा येथे थांबले. तेव्हा रेतीने भरलेला सोनालिका कंपनीचा एक ट्रॅक्टर क्रमांक एम एच २४ ए जे ७८४ ट्रॉली क्रमांक एम एच थर्टी जे ४९२३ हा काळा मारुती मंदिराजवळ आला. रेती उत्खनन व वाहतुकीचा परवाना तपासण्याकरिता त्याला इंगळे यांनी थांबविले. वाहन चालक रहमान शे. रऊफ शे. याने दिलेला परवाना महाखनिज बारकोड प्रणालीत स्कॅन केला असता तो अवैध असल्याचे आढळून आले. ही खबर इंगळे यांनी तलाठी गायकी यांना दिली. आणि त्यांना आपल्या जवळ येण्यास सांगितले.

त्यानंतर इंगळे हे त्या ट्रॅक्टर मध्ये बसले आणि ट्रॅक्टर पोलीस चौकीत घेण्यास वाहनचालकाला सांगितले. त्यांनी असे सांगताच ट्रॅक्टर सोबत असलेले अ.नजीर अ. कदीर, अ. वाहेद अ. खालिक. अ. अनवर आ. साबीर यांनी तलाठी इंगळे यांच्यावर दगड मार केली. ह्या दरम्यान वाहन चालकाने ट्रॅक्टर नाल्याकडे पळविला. इंगळे हे ट्रॅक्टर मध्येच बसलेले होते. ट्रॅक्टर नाल्याजवळ थांबविण्यात आला. त्यानंतर सात आठ जणांनी इंगळेंची कॉलर धरून त्यांना ट्रॅक्टर खाली खेचले. आणि जबर मारहाण केली. ह्या मारहाणी दरम्यानच ट्रॅक्टर मधील रेती तिथेच टाकण्यात आली. इतक्यात तलाठी गायकी हे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांना पाहताच हमलावर रेती माफिया जप्तीनाम्यावर स्वाक्षरी न करताच तेथून पळून गेले. इंगळेना जबर मारहाण झाल्याने त्यांना जखमा झाल्या आणि त्यातून रक्तस्त्रावही होत होता.

त्यामुळे तलाठी गायकींना घेऊन त्यांनी हिवरखेड पोलीस ठाणे येथे रहेमान शे. रउफ शे.,अ. नजीर अ. कदीर,अ. जाहेद अ. खालिक अ. अनवर अ. साबीरअ. दानीश अ. रफिक + ३ यांचे विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून हिवरखेड पोलिसांनी या आठ जणांवर भादवि ३५२, ३७९, ३३२, १४३, १४९, १४७, ४८(७), ४८(८) अन्वये विविध गुन्हे दाखल केले. यातील अ.अनवर अ.साबिर वय २८ वर्षे, अ.दानिश अ. रफिक वय २६ वर्षे. व अ. साजिद अ.खालिक वय ३४ वर्षे तिघेही राहणार अडगाव बुद्रुक या तिघांना हिवरखेड पोलिसांनी अटक केली असून पाच जण अद्यापही फरार आहेत. पुढील तपास पोहेकाॅं श्रीकृष्ण फुलचंद सोळंके हे करीत आहेत.
दरम्यान तलाठी संघटनेने या प्रकाराचा निषेध केला असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वहन रोखणे करिता तलाठ्यांना शासनाने शासकीय वाहन उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी केली आहे.

21/11/2022 रोजी सांयकाळी अंदाजे 05/30 वाजता दरम्यान मौजे शिवाजी नगर येथे अवंदय रेती वाहतुक व उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यावरुण मी सोबत श्री किशोर गायकी प्रभारी तलाठि शिवाजी नगर यांचे सोबत तळेगाव येथुन शिवाजी नगर येथे अंदाज 06/15 वाजता दरम्यान पोहचलो तेव्हा रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडण्यासाठि मी शिवाजी नगर येथील काळा मारोती मंदिर जवळ थांबलों व श्री किशोर गायकी हे अकोट हिवरखेड रस्ता, अडगाव फाटा येथे सापळा रचुन थापले त्यानंतर मला काळा मारोती मंदिर अडगाव बाजारा जवळ रेतीने भरलेला ट्रॅपटर हेडन MH 24AJ 784 व ट्रॉली नं. MH 30) 4923 ट्रॅक्टर सोनालीका निळया रंगाचा DI 42 RX हैंड व ट्रॉली हे वाहन आढळले मी त्याला परवाणा तपासणी करणे करीता थाबवले असता चालक रहेमान शेख रउफ शेख चालकाचे सांगणे वरुण त्याला वाळु वाहतुकिचा परवाणा मागीतला असता त्याने दाखवलेला परवाणा भी महाखनीज प्रणालीत बारकोड स्कॅन करून तपासला असता सदर परवाणा अवैदय आढळला त्यांनतर मी चालकाला रेतीने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली मुददमालासह अडगाव बु येथील पोलीस चौकीमध्ये घेण्याकरीता सांगीतले.

त्यानंतर मी सदर वाहनाचे जमीपत्र तयार करत असताना हि माहिती तलाठी शिवाजीनगर श्री किशोर गायकी यांना दुरध्वनीदचारे दिली त्या दरम्यान मी वरील नमुद वाहनावर बसुन सदर वाहन चालकास अडगाव पोलीस चौकीत नेण्यास सांगीतले परंतु वाह चालकाने ट्रॅक्टर मध्येच थांबवुन त्याचे सोबत असलेल्या अ. नजीर अ. कदीर, अ. जाहेद अ. खालीक, अ. अनवर अ. साबीर यांनी जमाव गोळा केला व माझेवर दगडफेक सुरू करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान चाहनचालकाने सदर वाहन है नाल्याच्या दिशेने पळवले व तेथे थांबवुन मला ट्रॅक्टर वरून माझी कॉलर घरून सात आठ लोकाच्या जमावाने खाली खेचुन पाडले व मला मारहाण करून ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न केला माझे कपडे फाडले व जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान ट्रॉलीतील रेती देखील त्यांनी रिकामी खाली केली.

सदर मारहाणीमध्ये वाहन चालक रहेमान शेख रउफ शेख व अ. नजीर अ. मंदिर, अ. जाहेद अ. खालीक अ. अनवर अ साबीर, अ. दानीश अ. रवि ईतर अन ओळखी तीन व्यक्ती यांनी मला मारहाण करुन जातीपत्रकावर स्वाक्षरी न करता वाहन पळवून नेले व त्यादरम्यान श्री कीशोर गायकी प्रभारी तलाठि शिवाजीनगर हे घटनास्थळी पोहचताच सदर जमाव तेथुन पळुन गेल्यामुळे माझा जीव वाचला मारहाणीमुळे माझा शरीरावर जखमा होवून रक्तस्थाव झाला व मला मुकामार लागला माझे कपडे व बनियान फाटले सदर घटनेची माहिती मी दरीष्ट अधिकारी यांना दिली व घटनास्थळावरून पोलीस स्टेशन हिवरखेड येथे तलाठि श्री किशोर गायकी यांचे सोबत कैफियत देण्यासाठी आलो. तरी संबधीताविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्मान करणे, अवैदयरित्या बेकायदेशिर जमाव गोळा करून मला जीये पाण्याचा प्रयत्न करणे, जबर मारहाण करणे शासकीय मालमत्ता गौणखनिज चोरी करणे जीवे मारण्याचा अददेशाने दगडफेक करणे व ट्रॅक्टरखाली चिरडुन मारण्याचा प्रयत्न करणे त्यानुसार संबधीताविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: