अकोला ते आकोट मार्गावर असलेल्या गांधीग्राम येथील किमान 100 वर्ष जुन्या पुलाला तडा गेल्यामुळे त्यावरील वाहतूक संपुर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे निर्देश जिल्हा प्रशासनाने व दहीहंडा पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे.
तर सदर पूल तातडीने दुरुस्त करुन वाहतुकीसाठी पुर्ववत खुला होईपर्यंत अकोला – अकोट रहदारीकरीता पर्यायी मार्ग म्हणून अकोला – म्हैसांग – सासन (किनखेड दहीहांडा राज्य मार्गास जोडणारा) व अकोला – म्हैसांग – दर्यापूर – अकोट राज्य मार्ग वळविण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.
या संदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार ही रहदारी वळविण्यात आली आहे. या आदेशान्वये अकोला ते अकोट रहदारीसाठी पर्यायी मार्ग म्हणून अकोला – म्हैसांग – सासन (किनखेड दहीहांडा राज्य मार्गास जोडणारा) व अकोला – म्हैसांग – दर्यापूर – अकोट या मार्गे वळविण्यात आली आहे. गांधीग्राम येथील पुल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले आहे.