Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | दोन अल्पवयीन मुलींवर पाच ते सहा नराधमांनी केला सामूहिक अत्याचार...न्यू...

अकोला | दोन अल्पवयीन मुलींवर पाच ते सहा नराधमांनी केला सामूहिक अत्याचार…न्यू तापडिया नगरातील खळबळजक घटना…

अकोला शहरातील न्यू तापडिया नगरात काल रात्रीच्या सुमारास पाच ते सहा नराधमांनी अवघ्या 14 व 16 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची तक्रार सिव्हिल लाईन पोलीसात पिडीतेच्या पालकांनी केली असून पोलीस त्या नराधमांचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील न्यू तापडिया नगरात शुक्रवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास 14 वर्षीय व सोळा वर्षीय दोन मुलींवर पाच ते सहा जणांनी मिळून गॅंग रेप केला. या प्रकरणात संशयित आरोपीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी दहा वाजता पासून सुरू होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ADS

शहरातील न्यू तापडिया नगर भागात शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान दोन मुलींवर पाच ते सहा जणांनी मिळून गॅंग रेप केल्याची घटना आज शनिवारी उघड झाली आहे. या नराधमानी त्या दोन अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचे समजत आहे. या प्रकरणाची तक्रार मुलींच्या पालकांनी रात्रीच केली असून आज सकाळी या प्रकरणातील पाच ते सहा संशिताना सिव्हिल लाईन पोलिसांनी घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: