अकोला – परतीच्या पावसामुळे परिसरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले उडीद पिकाचे उत्पादन बुडाले तर सोयाबीन कपाशी तूर व ज्वारी यदी पिकांचे नुकसान झाले हाता-तोंडाशी आलेला पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सतत पावसाने झालेल्या पावसामुळे कारंजा रमजानपुर शेतशिवारातील खरीप पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना पीक नुकसानाचे पंचनामे करून बराच काळ झाला असून, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही कारंजा रमजानपुर येथील शेतकरी बँकेत चकरा मारून त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी होत आहे.
अतिदृष्टीने परिसरात ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद व मुग इतर पिकांचे नुकसान झाले आहेत परिसरातील बोंड अळी का आक्रमण केल्याने कपाशी पीक फस्त केल्याने केले आहेत. त्यामुळे शेतकर्यांवर संकट आहे नुकसानग्रस्त पिकाचे संरक्षण झाले असूनही नुकसानग्रस्तांना साल २०२०-२०२१ मदत मिळाली नाही शेतकऱ्यांपुढे हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे? तरी कारंजा रमजानपुर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम त्वरित जमा करावी अशी मागणी कारंजा रमजानपुर शेतशिवारातील शेतकरी करीत आहेत