अकोला : जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुरणखेड गावातील वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकाऱ्याकानं शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नितीन उर्फ़ लखन मोहोड वय ३२, राहणार भिम नगर कुरणखेड़ असं गळफास घेणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असल्याने घटनेचं कारण समोर आल आहे.
नितिन उर्फ़ लखन भिमराव मोहड हे २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता जुन्या वस्तीतून घराकड़ जात असतांना त्याचवेळी लाईट नसलेला रेती वाहून नेणारा ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर आला. त्यावेळी नितीन हे थोडक्यात बचावले, यानंतर वाहन चालक अन् नितिनमध्ये हमरीतुमरी झाली. थोड्या वेळात लागलीच नितिनने त्याच्या भावाला पोलिसात तक्रार करण्यासाठी बोलावून घेतले. अन् चारचाकी वाहनाने नितिन आणि नातेवाईक तक्रार देण्यासाठी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात रवाना झाले. वाटेतच त्यांना ट्रॅक्टरचा वाहन चालक जसीम जियायोध्दीन खतीब तसेच त्याचे साथीदार जियायोध्दीन रियाजोदीन खतीब, सलमान रहेमान खान आणि मजर रहेमान खान या चौघांनी त्यांची चारचाकी वाहनाला रस्त्यात अडवून लोखंडी पाईप तसेच दगडाने मारहाण केली. तक्रार न देण्यासाठी धमकी दिली. अखेर नितीननं पोलिसात तक्रार नोंदवली आणि चौघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले.
नितीनच्या पोलिस तक्रारीनंतर जसीम जियायोध्दीन खतीब त्याचे साथीदार जियायोध्दीन रियाजोदीन खतीब, सलमान रहेमान खान आणि मजर रहेमान खान या चौघांकडून वारंवार धमक्या येत गेल्या. दिल्ली तक्रार मागे घे, नाहीतर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा, तसेच जीवे मारण्याची धमक्या देण्यात आल्या. यासंदर्भात तिच्या नातेवाईकांकडे धमकीचे कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचं समजते. एवढं होत असताना पोलिसांनी साधी अटकेची कारवाई या चौघांवर केली नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. तसेच या चौघांच्या त्रासाला नितिन कंटाळला होता, त्यातूनच त्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले.
दरम्यान काल सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काटेपूर्णा शेतशिवारात नितिनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आले. या प्रकारानंतर नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. तसेच नितीनचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी टाळाटाळ सुरू होती, आधी संबंधित लोकांना अटक करा, त्यानंतरच नितीनचा मृतदेह ताब्यात घेतला जाईल, असा हट्ट धरला. गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी करत कुटुंबीयांनी धरलेला हट्ट मागे घेतला. आणि पोलिसांकडून कारवाईचं आश्वासन देण्यात आलं.
नितीनजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे, त्यांनी आत्महत्या पूर्वी एका पानाची सुसाईड लुटलेली आहे, त्यामध्ये नमूद आहे की माननीय पोलीस अधीक्षक साहेब .. माझे काही दिवस अगोदर तक्रारीत नमूद असलेल्या चार लोकांसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्याकडून नेहमी जिवे मारण्याची धमक्या येत होत्या. आता चारही लोकांवर आपण योग्य कारवाई कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतोय. दरम्यान जर बोरगांव मंजू पोलिसांकडून वेळीच संबंधित व्यक्तींवर योग्य कारवाई झाली असती तर आज नितीनला आपला जीव गमवावा लागला नसता, अशाही चर्चा घटनास्थळी सुरू होत्या.
काल रात्री या प्रकरणात आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चारही लोकांवर बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या अगोदर दाखल असलेल्या तक्रारीतील आरोपींचा शोध घेण्यात आला, पण त्यांचा कुठेही सुगावा लागत नव्हता. सध्याही चारही लोकांचा शोध आहे, लवकरच त्यांना गजाआड़ करण्यात येईल, असे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खंडारे म्हणाले.…