अकोला – अमोल साबळे
देशभरात दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येत असते, परंतु अकोला जिल्हातील पातूर तालुक्यातील सांगोळा गावात रावणाची पूजा करण्याची प्रथा सुरूच आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सांगोळा गावालगत मन नदी वाहत असून, या नदीच्या काठावर ऋषी महाराज यांनी समाधी घेतली होती. या समाधीवर सिंधी नामक झाड उगवले, या झाडाच्या बुंध्याला दहा तोंडे निघाली,
यानुसार, मूर्ती बनवून त्याची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना करण्याकरीता सांगोळ्यातील एकाने शिर्ला येथील मूर्तिकाराला सांगितले. दहा तोंडाची मूर्ती बनविताना ती रावणाच्या प्रतिकृतीची झाली. मूर्ती ही रावणाची झाली असे समजल्यावर गावातील काही लोकांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याकरिता ती बैलगाडीत टाकून सांगोळा येथील समाधीस्थळी आणली. परंतु तेथील भगवान हनुमानाच्या मंदिरासमोरून रावणाची मूर्ती नेणे शक्य झाले नाही तसेच बैलसुद्धा पूढे सरकत मिळाली आहे.
नसल्याने या मूर्तीची स्थापना एका ग्रामस्थाने गावालगत शेताचे पूर्वबाजूला केली तेव्हापासून गावातील लोक दररोज पूजा करतात. अशी माहिती सांगण्यात येते. दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक घरून पुरणपोळीचा नैवेद्य आणून या मूर्तीला दाखविला जातो तसेच या दिवशी महाप्रसादाचे वितरण केले जाते. ‘रावणाची पूजा करणारे गाव म्हणून सांगोळा देशभरात ओळखल्या जाते. दसन्याच्या पूर्वसंध्येला भाविकांकडून तयारी पूर्ण केल्याची माहिती
सांगोळ्यात रावण पूजेसाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी जमते. दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी म्हणजे बुधवारी होणाऱ्या या पूजेसाठी रावणाच्या मूर्तीचे सुशोभीकरण करण्यात आले असून, ग्रामस्थांची तयारी पूर्ण झाली आहे..