अकोला – प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ता व नाली नसल्याने स्थानिक महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लावलेला फ्लेक्स भाजपच्या कार्यकर्त्याने फाडला असून ही दादागिरी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला अकोला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने जिल्हाधिकारी व अकोला पोलिसांना करण्यात आली आहे.
अकोला मनपा भाजप माजी नगरसेवक समर्थक व भाजप कार्यकर्ता बाळू देशमुख यांनी प्रभाग २० मधील महिलांनी लावलेला बॅनर फाडला. हा बॅनर महिलांना लावावा लागला कारण त्यांचे भागात गेली अनेक वर्ष रस्ता व नाली नाहीत.
सोबतच पाच वेळा ह्या रस्त्याचे भूमिपूजन होवून तो रस्ता कागदोपत्री तयार झालेले आहे, असा स्थानिकांचा आरोप असून महिलांनी आपल्या समस्या मांडताच त्यांना दादागिरी करीत बोलण्याचा अधीकार नाही हेच भाजप कार्यकर्त्याने आपल्या कृती मधून सिद्ध केले आहे.
हा महिलांचा अवमान असून नारी शक्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा अंधभक्तांचा जाहीर निषेध वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने करण्यात येत आहे. समस्त जिजाऊ नगर विकास समिती महिला मंडळ गोरक्षण रोड अकोला ह्यांनी देखील निषेध केला असून सत्तेचा माज आलेल्या लोकांना जनतेच्या भावना आणि अपेक्षा ह्याची पर्वा नाही. मतदार आणि सामान्य नागरिक लोकशाहीत सर्वोच्च असतात ह्याचा विसर भाजपला पडला आहे.
अकोला पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून बॅनर फडणाऱ्या कार्यकर्त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजे.अशी मागणी देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी ह्यांनी तातडीने बेड्या ठोकल्या पाहिजे अशी मागणी देखील वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने करण्यात आली आहे.
राजेन्द्र पातोडे, प्रदेश महासचिव,
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश