अकोला : शहरातील ‘काच बॉटल सप्लायर’ प्रसिद्ध व्यावसायिक ‘अरुणकुमार वोरा’ यांच्या अपहरण प्रकरणात अकोला पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. अखेर पोलिसांना अपहरण प्रकरणात मोठं यशं आलंय. अपहरण करणाऱ्या पाच व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहेय. अरुणकुमार यांच्या अपहरणप्रकरणात मुख्य आरोपी मिथुन उर्फ मॉन्टी इंगळे यांच्यासह 5 लोकांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून गुह्यात वापरण्यात आलेली कार आणि दोन बनावट देशी कट्टे तसेच चार मोबाईल फोन जप्त केले आहे. अरुणकुमार यांच्या अपहरण प्रकरणात 1 कोटि रुपयांची डिमांड अपरहरण कर्त्यांकडून झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
किशोर दाभाडे, फिरोज खान युसूफ खान, शरद पुंजाजी दाभाडे, अशिष अरविंद घनबाहादुर, राजा सरफराज खान, चंदु इंगळे या सात लोकांनी व्यासायिक वोरा यांचं अपहरण केल्याच समोर आले. दरम्यान दोघे जण फरार आहे, त्यांचा शोध सुरुये. दरम्यान अपहरणाच्या रात्री अकोल्यातल्या चिवचिव बाजारात आणि दुसऱ्या दिवशी कान्हेरी भागात एका खोलीत दोरीनं बांधूनं ठेवले होते. तसेच त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून आणि बंदुकीच्या धाकावर त्यांचं अपहरण झालं होतंय.
दरम्यान अकोल्यातल्या रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीतल्या चारजिन कापाउंड परिसरात ही अपहरणाची घटना सोमवारी रात्री घडली होतीय. दरम्यान दगडीपुल भागात ‘अरुणकुमार वोरा’ याचं ‘रिकाम्या काच बॉटल’चं गोदाम आहे, ते गोदाम बंद करून ते बाहेर पड़त असतानाच पांढ़ऱ्या रंगाची चारचाकी वाहन त्यांच्याजवळ आली. आणि 2 ते 3 जण (सुमारे) वाहनातून खाली उतरले आणि धाक दाखवत त्यांचं अपहरण करण्यात आले. यादरम्यान त्यांनी ‘बचाव-बचाव’ म्हणून आरडाओरड देखील केली. मात्र तोपर्यत उशीर झाला आणि अपहरणकर्त्यांनी वाहन सुसाट वेगानं पळवलं होतं. अखेर अकोला पोलिसांकडून ‘अरुणकुमार’ यांच्या अपहरणाचा खुलासा झालाय.
दरम्यान अकोला पोलिसांना अपहरणकर्त्यांचा सुगावा लागला, मात्र याची माहिती त्यांच्यापर्यत पोहचली, पोलिस आपल्यापर्यत पोहचणार, तितक्यात त्यांनी अरुणकुमार यांना एका ऑटो रिक्षात बसवून घराकड़ रवाना केलंय. ते घरी पोचताच पोलिस त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले, त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यांन काहींचे नावे समोर आले. सर्वांचं लोकेशनं हाती लागलं आणि रात्री उशिरापर्यत अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखानं 7 पैकी 5 अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं. अजूनही दोघे जण फरार आहे. मिथुन उर्फ़ मॉन्टी हा यातील मुख्य सूत्रधार असून तो दोन्ही पायानं अपंग आहे. त्याने फिरोज खान यांचा मदतीनं सर्व प्रकार केला असल्याचे तपासात समोर आले. दरम्यान फिरोज हा अरुणकुमार यांच्या गोदामावर रिकाम्या काचाच्या बॉटल पोचवन्याच काम करीत होता.
दरम्यान, अरुण वोरा’ या प्रसिद्ध व्यावसायिकाला त्याच्या गोदामासमोरून उचलण्यात आल्याने अकोला जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांकडून तत्काळ पाऊले उचलल्या गेली खरी, अखेर 2 दिवसांनंतर त्यांना तपासात यश आलं. अकोला शहरातल्या परिसरातल्या मुख्य मार्गावरील सीसीटीव्ही तपासणी केली, पण काही ठिकाणी कॅमेरा बंद असल्याने तपासात खूप मोठी अडचण येत आहे. पण 25 हजार रुपायाचं बक्षिस जाहिर होताच अपहरणकर्त्यांच्या मित्रांनं याचं बिंग फोडल आणि सर्व प्रकरणाचा खुलासा झालाय.
‘अरुणकुमार वोरा’ नेमके कोण आहे?
‘अरुणकुमार वोरा’ अकोल्यात नामाकिंत व्यवसायकांपैकी एक. त्याचं अकोल्यात ‘रिकाम्या काच बॉटल’ सप्लाय करण्याच मोठा व्यवसाय आहे. त्यांच्या कुटुंबात दोन मुली आणि एक मुलगा असून तो परदेशात आहे आणि मुली पुण्याला. ते एकटेच अकोल्यात वास्तव्यास आहे. त्याचं निवासस्थान हे अकोला जिल्हाधिकारी कार्यलयाजवळील राधे नगरात आहे.