अकोला : कॉंग्रसने एकीकडे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बंड पुकारून देशातील 28 पक्षांना एकत्रित करून INDIA आघाडी स्थापन केली मात्र आपल्याच पक्षाला नेत्यांना एकजूट ठेवण्यात कॉंग्रसला मोठी कसरत करावी लागत आहे. याचा प्रत्यय काल अकोल्यात आलाय. काँग्रेसच्या दोन नेत्यांचा अंतर्गत वाद झाला आणि त्याची व्हिडीओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झालीय…
या प्रकरणावरून अकोल्यात सध्या राजकारण चांगलंच तापलं आहेय, काही दिवसांपूर्वी अजीत पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका पदाधिकाऱ्याच्या प्रवेशावर वाद निर्माण झाला होता. तो आज काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ.अभय पाटील यांच्यात वाद झाला. वादाची ही किनार काही दिवसांपूर्वी झालेली काँग्रेसच्या बैठकीची आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अकोला लोकसभेचे निरीक्षक नाना गावंडे अकोल्यात कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी अनेकांनी आपल्या व्यथा आणि आपलं मत निरीक्षकाकडे मांडले.
यामध्ये माजी महापौर मदन भरगड यांनी वारंवार लोकसभ तिकीट मागणाऱ्या आणि पाच वर्ष पक्षात न दिसणाऱ्या उमेदवाराला तिकीट न देण्यात यावी अशी मागणी केली होती. याचा राग आज मनात धरून डॉ.अभय पाटील आणि मदन भरगड यांच्यात वाद झाला. काँग्रेसच्या पत्रकार परिषदे नंतर हा प्रकार घडला, फोटो सेशन करतांना या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि रागाच्या भरात डॉ.अभय पाटील हॉलच्या बाहेर निघून गेले. वाद विकोपाला जात असल्याचं पाहता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभय पाटील यांची समजूत काढली आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढलं. मात्र नाव न घेता मदन भरगड यांनी सर्व आरोप माध्यमांसमोर मांडले आणि कोणताही वाद बंद कमऱ्यात झाला नसल्याचं ही म्हंटलंय..
अकोला | अन् डॉ. अभय पाटील निघून गेले…काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर…#अकोला_कॉंग्रेस @INCMaharashtra pic.twitter.com/rgQc8rFzQF
— Mahavoice News (@MahaVoiceNews) October 18, 2023