Monday, December 23, 2024
HomeUncategorizedअकोला | महायुती-महाआघाडीच्या धोरणाने ग्रस्त असलेल्या सर्व पक्ष-संघटनांना एकत्रित या!...शेतकरी संघटना

अकोला | महायुती-महाआघाडीच्या धोरणाने ग्रस्त असलेल्या सर्व पक्ष-संघटनांना एकत्रित या!…शेतकरी संघटना

अकोला : येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष सुद्धा मैदानात उतरणार आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित दादा बहाळे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अकोल्यात पत्रकार परिषदेत महायुतीच्या धोरणाने ग्रस्त असलेल्या सर्व पक्ष संघटनांना एकत्रित येण्याचे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. अकोल्यातील हॉटेल सेंटर प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले…लोक प्रतिनधित्व अधिनयमाने ठरवुन देलेला राज्य विधानसभेचा कार्यकाळ संपन्न होत आलेला आहे. विधानसभा पुनर्गठित करण्यासाठी निर्वाचन आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. निवडणूकीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या प्रस्थापित राजकीय समुहांनी संगठित केलेल्या युत्या आघाड्याच्या हालचाली वाढल्या आहेत. युत्या आघाड्यांनी आपापल्या सत्ता काळात अवलंबलेल्या धोरणाने उत्पादक श्रम, शेती, उद्योग, सेवा-उद्योग, अनुसंधान या सर्व क्षेत्रातील उद्योजकता क्षिण पावत आहे. संपत्ती निर्माण करणार्या सर्व सामाजिक घटकांविरूद्ध विविध प्रकारे निर्बंधकिंवा जाचक कर प्रणाली विकसित केली आहे.

महसुल निर्मित ची विविध साधनं निर्माण करून एकुणच अर्थव्यस्थेला घातक अशाप्रकारे खर्च करणे याचा सपाटाच लावला आहे. राजकारणाचे स्वरूप सत्ताकारणात रुपांतरीत करून स्थापित करण्यात आले आहे. धोरणाने उद्भवलेल्या समस्यांचे समाधान अर्थसंकल्पीय तरतूदीने करण्याच्या उपद्व्यापामुळे अर्थार्जनाची साधनं विकसित होण्यामध्ये अडथडे निर्माण होत आहे. अल्पार्जन, बेरोजगारी, आरक्षणविषयक जातीय अस्मिता, नोकरशाही चा हैदोस अश्या एक ना अनेक वित्तीय, आर्थिक, सामाजिक अवस्थेला समाज समोर जात आहे. परिवर्तन आघाडी धोरणात्मक परिवर्तनाचा पर्याय म्हणून मतदारांना उपलब्ध होणार आहे, सत्ता परिवर्तन म्हणून नाही. आपल्या माध्यमातून महायुती महाआघाडी च्या धोरणाने ग्रस्त असलेल्या सर्व पक्ष-संघटनांना एकत्रित येण्याचे आवाहन शेतकरी संघटना यांनी केले आहे . या वेळी विलास ताथोड, अविनाश नाकट, डॉ निलेश पाटील, सुरेश जोगळे, सतीश देशमुख, धनंजय मिश्रा, बळीराम पांडव, जसराज बहाळे, राजकुमारभाऊ भटड, सतीश उंबरकर, डॉ मुकेश टापरे, शंकर कंवर आदी शेतकरी नेते उपस्थित होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: