Friday, January 3, 2025
Homeगुन्हेगारीAkola | आकोट कस्टडी डेथ मोठी अपडेड!...कस्टडी रूमचा सीसीटीव्ही होता बंद!...गोवर्धनच्या मृत्यूचे...

Akola | आकोट कस्टडी डेथ मोठी अपडेड!…कस्टडी रूमचा सीसीटीव्ही होता बंद!…गोवर्धनच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात…

Akola : अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिस ठाण्यातील कस्डटी डेथ प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येतायत. कस्टडी रुम समोरील सीसीटीव्ही कॅमेरा हा मागील सहा महिन्यापासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे इतर पाच कॅमेरे सुरु असून नेमका हाच कॅमेरा कसा बंद होता, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान गोवर्धन हरमकार याचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याच प्रकरण 3 महिन्यानंतर उघडकीस आलं होतं, त्यानंतर प्रकरणात 11 पोलिसांवर कारवाई झाली आहे. आतापर्यंत PSI सह 3 पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल असून दोघे अटकेत आहे, तर दोघे फरार आहे. विशेष म्हणजे अकोटच्या ठाणेदारासह अन्य आणखी PSI आणि 5 पोलिस कर्मचार्यांवर बदलीची कारवाई झाली आहे. अजूनही अनेकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

गोवर्धन हरमकार मृत्युप्रकरण 15, 16 आणि 17 जानेवारी रोजी अकोट शहर पोलिस ठाण्यात घडल आहे. एका गुन्ह्याच्या संशयाखाली गोवर्धनला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतंय आणि त्याचा मारहाणीत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आश्चर्याची बाब ही की, १८ जानेवारीदरम्यान तत्कालीन ठाणेदार तपण कोल्हे यांनी पोलिस स्टेशनमधील कस्टडी रुमचा सीसीटीव्ही बंद असल्याबाबत पोलिस अधिक्षकांना पत्र लिहले होते. एसपींच्या पत्रानंतर पुण्यातील सुजाता कॉम्प्युटर या कंपनीचे इंजिनिअर अरुण पाटील हे अकोट पोलिस स्टेशनला आले होते. त्यांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात बिघाड असल्याचा खुलासा केला. त्यामुळे पोलिसांच्या परवानगीने त्यांनी डीव्हीआर काढून घेवून गेले. त्यानंतर त्यांनी कळवले की यामध्ये मागील सहा महिन्यापासून कोणतेही रेकॉर्डींग झालेले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. वास्तविकता डीव्हीआर त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द करायला हवा होता. मात्र त्यांनी तसे केले नाही. सीआयडीने यादृष्टीने सुद्धा तपास करणे गरजेचे असल्याचे मत खात्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

3 दिवसातील घडामोडींची नोंद –

पोलिस स्टेशनमधील सर्व कॅमेरे चालू असताना नेमका हाच कॅमेरा कसा बंद होता, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. काढून नेण्यात आलेल्या डीव्हीआरमध्ये नक्कीच 15, 16 आणि 17 जानेवारीला घडलेल्या घटनांची नोंद असण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी सदर डीव्हीआर जाणीवपूर्वक काढून घ्यायला लावला. त्यानंतर १८ तारखेच्या दरम्यान पोलिस निरिक्षकांकडून एसपींना पत्रव्यवहार झाला. हा सर्व प्रकार संशयास्पद असून पुरावे नष्ट करण्यासाठी तर हा प्रकार केला नसावा अशीही चर्चा पोलिस वर्तुळात होतंय.

नेमक्या कोणत्या पोलिसांवर झाली कारवाई-

दरम्यान जानेवारी महिन्यात गोवर्धन हरमकार या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आतापर्यत PSI राजेश जवरे आणि पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंकेसह एकत्रित चार पोलिसांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून PSI राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळुंके हे न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान याप्रकरणी गुन्हे दाखल झाले तेव्हापासून अकोट पोलीस ठाण्यातील मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पंचांग आणि रवि सदांशिव हे नॉटरीचेबल असून त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली. इतकेच् नव्हेतर अकोटचे ठाणेदार तपण कोल्हे आणि अकोट ग्रामिण पोलिस स्टेशनचे PSI विष्णू बोडके यांना बदलीच्या कारवाई समोरे जावे लागले. या प्रकरणी अधिक तपास CID करीत आहे. दरम्यान गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणावर स्थानिक गोपनीय विभागाने दोन महिने मौन पाळलं. एवढं मोठं प्रकरण दडपून ठेवल्या गेलं, याची कल्पना सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली गेली नाही. यावर देखील संशय उपस्थित होतो आहे.

नेमकं कुटुंबियांची तक्रार काय?

मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील ‘PSI राजेश जवरे’ आणि इतर 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी पूतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यानंतर 16 जानेवारीला सुकळी गावात आणत घर झड़ती घेतली. पुढ, पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. 16 जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण सुरू झाली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केलंय. गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला बाहेरील ‘आकाश’ नामक व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलंय. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आले की त्याच्या छातीची हाडं तूटली होती, असा आरोपही नातेवाईकांच्या तक्रारीत होता.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: