अकोला : काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज ७१ वा दिवस असून यात्रा आज अकोला जिल्ह्यातील पातुर येथून सकाळी निघाली होती. यादरम्यान राहुल गांधींन पाठींबा दर्शविण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर दिसत होता. आजच्या सकाळच्या सत्रात राहुल गांधी यांच्यासोबत अभिनेत्री रिया सेन दिसल्याने अनेकांना कुतहूल वाटले. नेमक कोण राहुल गांधी यांच्या सोबत चालत आहे समजत नव्हत. तर काही वेळाने रिया सेन यांच्या मित्राने पोस्ट शेयर केल्यामुळे रिया सेन असल्याचे स्पष्ट झाले.
बॉलिवूड अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट, अभिनेता सुशांत सिंग नंतर आता अभिनेत्री रिया सेन देखील या प्रवासाचा एक भाग बनल्याने या पदयात्रेच महत्व वाढत असल्याचे दिसत आहे. ‘केवळ चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर एक स्वाभिमानी नागरिक म्हणूनही या व्यासपीठाचा भाग बनल्याचा आनंद आहे!’…असे रिया सेन यांनी ट्वीट म्हटले आहे.
यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट हैदराबादमध्ये ‘भारत जोडो यात्रे’मध्ये राहुल गांधींसोबत सामील झाली होती. दोघांनी एकत्र फिरून अनेक विषयांवर चर्चा केली. पूजा भट्ट आणि राहुल गांधी यांचा फोटो काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि त्यात लिहिले होते- दररोज नवा इतिहास रचला जात आहे, देशात दररोज प्रेम शोधणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
आणि गेल्या आठवड्यात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगनेही काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी मंचावरून भाजपचे नाव न घेता निशाणा साधला आणि म्हटले की, अनेक लोक द्वेष पसरवत आहेत, पण प्रेमाचा मार्ग अवघड आहे.