Sunday, September 8, 2024
spot_img
Homeसामाजिकअकोला | महात्मा फुले यांची प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते संदीप कुलकर्णी हे...

अकोला | महात्मा फुले यांची प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते संदीप कुलकर्णी हे बाळासाहेब आणि अंजलीताईची मुलाखत घेणार…

अकोला : सह्याद्री फाउंडेशन, अकोला आयोजित राम जाधव नाट्यतपस्वी पुरस्कार सोहळा 2023 संपन्न होणार आहे. या सोहळ्यात “संवाद जिव्हाळ्याचा या कार्यक्रमांतर्गत ऍड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची प्रकट मुलाखत आगामी सत्यशोधक या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक निलेश जळमकर आणि महात्मा फुले यांची प्रमुख भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी घेणार आहेत.

अकोल्याचे सुपुत्र निलेश जळमकर दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ येत्या ५ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे, त्यानिमित्य सत्यशोधक चित्रपटाची टीम अकोला दौर्यावर आहे. सह्याद्री फाउंडेशनने आयोजित केलेला ‘संवाद’ जिव्हाळ्याचा’ कार्यक्रम आज सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्य गृह अकोला येथे या चित्रपटाचे प्रमुख कलाकार अभिनेते संदीप कुलकर्णी हे ऍड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर सोबतच सत्यशोधक या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक निलेश जळमकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: