Monday, December 23, 2024
Homeराज्यअकोला | अतिवेगाने चालणा-या वाहनांवर करणार कारवाई...आरटीओ’च्या तपासणी यंत्रणेत अत्याधुनिक वाहनांची भर...

अकोला | अतिवेगाने चालणा-या वाहनांवर करणार कारवाई…आरटीओ’च्या तपासणी यंत्रणेत अत्याधुनिक वाहनांची भर…

अकोला, दि. 6 : (संतोषकुमार गवई)प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणी यंत्रणेत 3 इंटरसेप्टर वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सदोष वाहन तपासणी, तसेच अतिवेगाने चालणा-या व नियमभंग करणा-या वाहनधारकांवर कारवाईला वेग येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.

तपासणी ताफ्यात 3 वाहनांची भर पडल्याने आता एकूण 4 इंटरसेप्टर वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यात स्पीड गन, ब्रेथ ॲनालायझर, टायर ट्रेंड ग्रेज ही उपकरणे उपलब्ध आहेत. स्पीड गनद्वारे अतिवेगातील वाहनांवर, तसेच ब्रेथ ॲनालायझरच्या तपासणीद्वारे दारु पिऊन वाहन चालविणा-यांवर कारवाई करण्यात येईल. या वाहनांतील लेझर कॅमे-याद्वारे तपासणीतून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात येईल, असे श्रीमती दुतोंडे यांनी सांगितले.

वाहनांतील उपकरणे अद्ययावत व तंत्रदृष्ट्या अधिक प्रभावी आहेत. त्यामुळे वाहतुकीत दोषी आढळणा-या वाहनांची तत्काळ नोंद होऊन वाहनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जाईल. अपघात टाळण्यासाठी व आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी रस्त्यावर वाहन चालविताना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
०००

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: