अकोला : पोलीस स्टेशन उरळ दिनांक 24/9/22 रोजी सायंकाळी दरम्यान ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की ग्राम हाता येथून एक इसम त्याचे मालवाहू गाडीमध्ये शासकीय राशन चा जीवनावश्यक वस्तू असलेला तांदूळ कमी भावाने विकत घेऊन काळाबाजार करण्याकरता व चढ्या भावाने विक्री करता घेऊन जात आहे अशा माहितीवरून तात्काळ पोलीस स्टेशन येथील पथक रवाना केले.
पथकाने ग्राम हाता बस स्टॅन्ड वरून संशयित वाहन MH-28-AB-5651 महिंद्रा जीतो कंपनीचे वाहनाची पाहणी केली त्यामध्ये गुप्त माहिती मिळाल्याप्रमाणे राशन चा तांदूळ एकूण 5 क्विंटल किंमत अंदाजे 5500/- व मालवाहक गाडी किंमत अंदाजे 2,00,000/- असा एकूण 2,05,500/- रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या राशनच्या तांदुळाचा मिळून आल्याने जप्त करून आरोपी मोहम्मद फारूक मोहम्मद युसुफ वय 36 वर्ष रा. हालोपुरा बार्शीटाकळी जि अकोला याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन उरळ येथे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कारवाई करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब, पीएसआय मोरे पोलीस अंमलदार गजानन ठोंबरे, नागेश बाभुळकर विकास वैदकार यांनी कार्यवाही केली