Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअकोला । पाणी भरायच्या लगबगीने गेला महिलेचा जीव…येळवण गावातील दुर्दैवी घटना…

अकोला । पाणी भरायच्या लगबगीने गेला महिलेचा जीव…येळवण गावातील दुर्दैवी घटना…

अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील येत असलेल्या येळवण गावात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका 40 वर्षीय महिलेचा शॉक लागून मृत्यू झाला. नळ आले म्हणून पाणी भरण्याच्या लगबगिने मोटार सुरू करण्याच्या नादात शॉक लागला मृत्यू झाला. रेखा ठाकरे असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येळवन गावात गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे, मुबलक पाणी असून सुद्धा व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने, जेव्हा पाणी पुरवठा केला जातो तेव्हा गावातील महिलांची पाण्यासाठी पळापळ सुरू होते. अश्यातच अश्या घटना घडतात आजही तसेच झाले.

रेखा ठाकरे ही महिला लगबगीने घरातील कामे सुरू असतानाच अचानक नळ आले असे कळताच ती पाण्याची मोटर सुरू करण्याकरिता गेली असता तिला जबर शॉक लागला. तिला वाचविण्यासाठी घरातील मंडळी धावली, नंतर उपचारासाठी अकोला नेत असतांना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: