Monday, December 30, 2024
Homeमनोरंजन"अमृत महोत्सवाचे अमृत क्षण"...न थांबता ७५ मिनिटे देशभक्तीपर समूह गायनाचा रंगतदार कार्यक्रम...

“अमृत महोत्सवाचे अमृत क्षण”…न थांबता ७५ मिनिटे देशभक्तीपर समूह गायनाचा रंगतदार कार्यक्रम संपन्न…

मेलोडीज ऑफ अकोला व इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया ह्यांचा संयुक्त उपक्रम…

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अकोला शहरातील गायनाची आवड असणाऱ्या प्रतिष्टीत अधिकारी, व्यापारी,डॉक्टर्स, सनदी लेखापाल , अभियंते ह्यांचा समूह असलेल्या “मेलोडीज ऑफ अकोला व” इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट” ह्यांचे संयुक्त विद्यमाने स्थानिक आइसिएआई भवन,तोष्णीवाल ले आऊट येथील सुंदर सभागृहात सतत न थांबता 75 मिनिटे देशभक्तीपर समूह गायनाचा रंगतदार कार्यक्रम 15 ऑगष्ट ला संध्याकाळी पार पडला.

सुरवातीला मेलोडीज ऑफ अकोला चे अडमिन मनोज चांडक ह्यांनी कार्यक्रमा मागची भूमिका विशद केली त्या नंतर मेलोडीज चे सदस्य तसेच निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे,अकोला शहर पोलीस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम चे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके ह्यांचे सह मेलोडीज ऑफ अकोलाचे ग्रुप अडमिन CA मनोज चांडक, अजय सेंगर, संतोष अग्रवाल, महेंद्र खेतांन, जयप्रकाश राठी, संजय पिंपरकर, राजेश पूर्वे, निधी मंत्री, मंजिरी अग्रवाल, रवी खंडेलवाल, CA विक्रम गोलछआ, दीपक चांडक, अतुल आखरे, महेश अरोरा, ह्यांनी सतत 75 मिनिटे देशभक्तीपर सामूहिक गायन केले त्यांना अकोला शहरातील प्रसिद्ध जयगुरु वाद्यवृन्दाने संगीतिक साज चढवला, शेवटी ” मेरे देश की धरती सोना उगले,उगले हिरे मोती,मेरे देश की धरती हे देशभक्तीपर गीत सादर झाले तेव्हा संपूर्ण सभागृहाने ठेका धरून व नृत्य करून वातावरण उत्साही व जोशपूर्ण बनविले.

शेवटी ऍड पावस सेंगर, पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे ह्यांनी आपलें वयक्तिक गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली, सरते शेवटी प्रभात किड्स चे सर्वेसर्वा गजानन नारे तसेच डॉक्टर कैलास लहरिया ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मान्यवरांचे हस्ते सहभागी मेलोडीजना स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी CA हिरेन जोगी,पंकज लदनिया,सुमित अलीमचंदाणी,भूषण जाजू,शंकर गांधी,रमेश गोलेछा, एस एस लोहिया,नीरज बोरा, पंकज अग्रवाल, आदित्य मोहता ह्या सनदी लेखापाल ह्यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे बहारदार संचालन अजय सेंगर व राजेश पूर्वे ह्यांनी केले, मेलोडीज ऑफ अकोला च्या सदस्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमा ने देशप्रेमाची वातावरण तयार झाले होत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: