अकोल्यातील नामांकित डॉक्टरने एका २० वर्षीय युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणात रामदासपेठ पोलीस ठाण्यात पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एस.एम. अग्रवाल असे डॉक्टरचे नाव असून पिडीत तरुणी किडनी स्टोनच्या आजारावर उपचार घेण्यासाठी आली होती. प्रसिद्ध डॉक्टरावर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस स्टेशन मध्ये बराच मोठा जमावं जमा झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील असल्याचे समोर आले असून २० वर्षीय युवती किडनी स्टोनचा आजार असल्याने डॉ. एस. एम अग्रवाल यांच्याकडे उपचारासाठी आली होती. यादरम्यान तपासणीच्या नावाखाली अग्रवाल यांनी युवतीला केबिनमध्ये बोलावल्यानंतर तिचा विनयभंग केल्यावरून युवतीने आरडाओरडा केला. त्यामुळे तिथे काही युवक जमा झाले आणि त्यांनी डॉ. अग्रवाल ह्यांना मारहाण केल्याची माहिती मिळाली असून त्यावेळी डॉ. अग्रवाल ह्यांनी कशीबशी सुटका करून तेथून पळ काढला असे काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
घटना झाल्यानंतर युवतीने आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन रामदास पेठ पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळ पंचनामा व तांत्रिक माहिती घेतल्यानंतर डॉ. एस. एम. अग्रवाल यांच्याविरुद्ध गुरुवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याचे समजते. या प्रकरणाच्या माहितीला रामदास पेठ पोलिसांनीही दुजोरा दिला असून गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.