अकोला ते दर्यापूर मार्गावर असलेल्या म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावरून काल रात्री 11 वाजताच्या दरम्यान एका 35 वर्षीय युवकाने पूर्णा नदीच्या पुलावरून नदीत उडी घेतल्याची घटना समोर आली असून त्या युवकाचा शोध सध्या सुरु आहे मात्र, अद्याप पर्यंत त्या युवकाचा शोध लागला नाही. सदर घटना बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून पोलिसांनी बचाव पथकाला प्राचारन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 11 वाजताच्या दरम्यान एका इसमाने म्हैसांग येथील पूर्णा नदी पात्राच्या पुलावरून उडी मारण्याची घटना घडली. उडी घेतलेल्या युवकाने आपली कार एम. ऐच.15 ई. एक्स 5432 ही गाडी पुलाच्या बाजूला पार्क करून पूर्णा नदीत उडी घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार उडी घेलेला युवकाचे नाव सुधीर रमेश तायडे असून वय 35 वर्षे शास्त्री नगर येथील राहवासी आहे.
सदर इसम हा नाशिक येथे खाजगि कंपनीत कामाला असून दिनांक 6 ऑगस्ट रोजी अकोल्यात आला होता. मिळालेल्या माहिती नुसार सुधीर तायडे हा काल रात्री 9 वाजता घरून निघाला याने घरच्या मोबाईल वर मेसेज करून आपण म्हैसांग येथील नदीत उडी घेत असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस व सुधीर तायडे यांचे नातेवाईक काल रात्री पासूनच घटनास्थळी हजर असून सुधीर तायडे याने नेमकी टोकाची भूमिका का घेतली याचा तपास अध्याप पर्यंत लागला नसून बचावं पथकला घटनास्थळी प्राचारन करण्यात आले आहे.