Sunday, January 5, 2025
HomeMarathi News Todayअकोला | 'तो' २२ वर्षीय तरूण मोबाईलवर बोलत असतांना अचानक प्रवाशी निवाऱ्याचा...

अकोला | ‘तो’ २२ वर्षीय तरूण मोबाईलवर बोलत असतांना अचानक प्रवाशी निवाऱ्याचा स्लॅब कोसळला…अन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला…

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर येथील प्रवासी निवाऱ्याचा स्लॅब कोसळल्याने येथील रहिवाशी विकी वसंत कोकरे वय अंदाजे (22) याचा दाबून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंजरच्या रेस्क्यु टीमने अर्ध्या तासातच घटनास्थळी गाठुन रेस्क्यु ऑपरेशन केले अक्षरश घन लोखंडी रॅम्प,राॅड, कटरच्या साहाय्याने अवघ्या विस मिनिटात कॉंक्रीट तोडुन मोठया शिताफीने मलब्याखाली दबलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढुन पोलीसांच्या ताब्यात दिला नंतर नातेवाईकांसह लगेचच पथकाच्या रुग्णवाहिकेने पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील प्रवाशी निवाऱ्यात हा मोबाईल बोलत असताना अचानकपणे पुर्ण स्लॅब कोसळला आणी तो त्याखाली दबल्या गेल्या यात त्याचा घटन्साठ्लीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती माहीती पिंजर येथील ठाणेदार अजयकुमार वाढवे साहेब यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशनसाठी पाचारण केले.

तेव्हा लगेच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर सळेदार,सुरज ठाकुर, ज्ञानेश्वर वेरुळकार,महेश साबळे, महेश वानखडे, यांच्यासह शोध व बचाव साहीत्य घेऊन घटनास्थळी अवघ्या 30 मिनिटातच दाखल झाले यावेळी दिपक सदाफळे यांनी सिन ट्रेस केला असता पुर्णपणे स्लॅबखाली तो युवक दबल्याचे लक्षात आले क्षणाचाही विलंब न करता टेक्नीकलरीत्या चक्क स्लॅब फोडणे चालु केले आणी लगेचच अवघ्या विस मिनीटात मलब्याखाली दबलेला युवकाला बाहेर काढले.

यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे साहेब पिएसआय बंडू मेश्राम साहेब,बेलोरकार साहेब हे हजर होते.तसेच सरपंच ठोंबरे जमकेश्वर उपसरपंच नितीन गवई धाकली, राकाॅचे ता.प्र.सतीश पाटील गावंडे,पं.स. राधेश्याम खरतळे, पंसं.सिहासन जाधव, पो.पा.देशमुखसह यावेळी गावकरी मोठया प्रमाणावर जमलेले होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: