Monday, December 23, 2024
HomeMarathi News TodayAkluj Wedding | दोन दिवसापूर्वी जुळ्या बहिणींशी केलेला विवाह आज नवरदेवाच्या अंगलट...

Akluj Wedding | दोन दिवसापूर्वी जुळ्या बहिणींशी केलेला विवाह आज नवरदेवाच्या अंगलट आलाय…

Akluj Viral Wedding | सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असून या व्हिडिओची जिकडे तिकडे चर्चा आहे तर हा व्हिडिओ एकाच मांडवात जुळ्या बहिणींशी विवाह केल्याचा हा व्हिडिओ आहे. सदर व्हिडिओ अकलूज मधील असून आता या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केलेल्या नवरदेवाच्या अंगलट आलाय नवरदेवाच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

अकलूजमधल्या एका लग्नाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. एक तरूणाने चक्क दोन मुलींशी एकाच मांडवात लग्नगाठ बांधलीये. अतुल अवताडे या तरूणाने रिंकी आणि पिंकी पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींसोबत बांधली असून या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर झाला होता आता मात्र या आनंदावर तक्रारीचे विर्जन पडले आहे.

अतुल अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर 2 मध्ये राहणाऱ्या तरुणाने 2 डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी पाडगावकर आणि पिंकी पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला.पण त्यांचा हा आनंद दोन दिवसही टिकला नाही. अतुल विरोधात तक्रार करण्यात आली आहे.माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबतची तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

अतुलच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल झाला आहे.

रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणी आहेत. त्यामुळे त्या एकमेकींसोबत लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. दोघींनी एकत्रच इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्या दोघी कायम एकमेकींसोबत असतात. इथून पुढेही त्यांना एकमेकींसोबत राहायची इच्छा आहे. त्यामुळे त्या दोघींनीही एकाच मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांआधी त्यांची अतुलसोबत ओळख झाली. त्यानेही या लग्नाला होकार दिला. अन् 2 डिसेंबरला या तिघांचा विवाह सोहळा पार पडला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: