Saturday, November 23, 2024
Homeमनोरंजनगणेश तळेकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार प्रदान...

गणेश तळेकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार प्रदान…

मुंबई – गणेश तळेकर

अनेक वर्षे नाटकक्षेत्रात काम करत ,अनेक वर्षे ते नाटय व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत, अनेक इव्हेंट करत आलेआहेत, निस्वार्थीपणे सेवा करत , या आनंदात आणखीन एक भर पडली आहे अखिल भारतीय नाट्य परिषद तर्फे त्यांना ” लीला मेहता पुरस्कृत भार्गवराव पांगे कार्यकर्ता पुरस्कार ” , मध्यवर्ती ,मुंबई कार्यालयात निस्वार्थीपणे कार्य केल्याबद्दल शुक्रवार ,दिनांक : १४ जून २०२४ रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

त्यांना हा पुरस्कार महाराष्ट्राचे अत्यंत लाडके अभिनेते महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफ सर आणि दिग्गज दिग्दर्शक व शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल सर यांच्या हस्ते मिळाल्याने त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता . त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना खूप भारावून गेले होते. महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय श्री. शरद पवार साहेब..

उद्योग मंत्री श्री. उदय सामंत साहेब.. माननीय श्री. शशी प्रभू साहेब , जेष्ठ अभिनेत्री रोहिणी ताई हट्टंगडी… दिग्गज अभिनेते निर्माते व अध्यक्ष श्री. प्रशांत दामले सर, श्री. अशोक हांडे सर, माझी नाटय परिषद अध्यक्ष , श्री मोहन जोशी, श्री सतीश लोटके सर , श्री शिवाजी शिंदे सर , पदाधिकारी , सभासद आणि नाटक अखिल भारतीय नाट्य परिषदेचे त्यांनी मनापासून आभार मानले. सर्व सहकलाकार तंत्रज्ञ व बॅकस्टेजच्या संपूर्ण टीमचा मी अत्यंत ऋणी आहे.

या साऱ्यांमुळे.. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळणे ही आपल्या कामाची पावती तर आहेच, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही करून देते. त्यामुळें मी यापुढे मी रंगभूमीची सेवा करताना अशाच चांगल्या प्रकारे काम करत राहण्याचा मी मनापासून आयुष्यभर प्रयत्न करत राहीन. त्यानीं असे सांगीतले

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: