Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनअखिल भारतीय भंडारी समाज महासंघ - नाटक, चित्रपट,मालिका,जाहीरात क्षेत्रात पाऊल टाकत...

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ – नाटक, चित्रपट,मालिका,जाहीरात क्षेत्रात पाऊल टाकत आहे…

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ ही धर्मादाय आयुक्त मुंबई ह्यांच्याकडे नोंदणीकृत संस्था असून, संस्थेने त्यांच्या ध्येय धोरणानुसार नाट्य-सिने-मालिका- जाहीरात या क्षेत्रात होतकरू कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करीत आहे. जेणेकरून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल. व त्या अनुषंगाने भविष्यात त्यांना संधीही उपलब्ध होऊ शकेल.

ह्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर विनामूल्य एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर शनिवार दिनांक १० जून २३ रोजी संध्या.५ ते ८ या कालावधीत किते भंडारी सभागृह, गोखले रोड, छ. शिवाजी पार्क, सेनाभवनच्या मागे दादर मुंबई यथे आयोजित केले आहे. ह्या मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन अभिनेता विजय पाटकर,

प्रमुख अतिथी लेखक-दिग्दर्शक-कलाकार गंगाराम गवाणकर, प्रमुख उपस्थितांमध्ये लेखक-साहित्यिक- नाटककार प्रा.डॉ. प्रदीप ढवळ, निर्माता-लेखक-दिग्दर्शक संदीप वाईरकर, गायक सुधीर मांजरेकर, लेखक-दिग्दर्शक आबा पेडणेकर व नंदा आचरेकर, संगीतकार गजेंद्र मांजरेकर, लेखिका-अभिनेत्री,

विजया कुडाव व विद्याताई मंत्री, नेपथ्यकार सुधाकर मांजरेकर इत्यादींचे मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती महासंघाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख गणेश तळेकर ह्यांनी दिली. महासंघाचे अध्यक्ष श्री. नविनचंद्र बांदिवडेकर ह्यांनी शनिवार दि. ३ जून २३ रोजी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे live on music प्रस्तुत ” भाव प्रेमाचे ” या music अल्बम च्या पोस्टर चे लॉंच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कार्यालयात सह – कार्यवाहक चैताली डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले,

त्यात आपल्या भंडारी समाजाचा मुलगा मयूर भाटकर व ऐश्वर्या बदाडे उपस्थित होते, व बाल कलाकारांनी सादर केलेल्या अर्चना थिएटर – निर्माते शेखर दाते ,लेखक – दिग्दर्शक रमेश वारंग व के. राघवकुमार याच्या छोटा भीम , डोरेमन , जंगलातील धमाल या नाटिकांच्या प्रयोगादरम्यान हौशी कलावंतांनी महासंघाच्या कार्यशाळेत प्रवेश करून उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याची तयारी महासंघाने दाखविली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: