पुनरागमनायच… जिकडे पहावे तिकडे तू दिसशी नयना…
खामगांव – हेमंत जाधव
विदर्भ पंढरी असलेल्या संत नगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे आज स्वगृही आगमन झाले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे वारकरी तसेच भाविकांवर पुष वर्षाव करून आ अँड आकाश फुंडकर यांनी मनोभावे स्वागत केले.
गेल्या दोन महिन्यात पासून विदर्भ पंढरी असलेल्या संत गजानन महाराज संस्थान यांची पायी पालखी आषाढी एकादशी सोहळ्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे पंढरपूर येथून परत शेगाव येथे परतली. काल अखेरचा मुक्काम रजतनगरी खामगाव येथे झाला. खामगांव शहरात श्रींच्या पालखीचे विविध सामाजिक संस्था,संघटना,सार्वजनिक मंडळ यांच्या वतीने तसेच भाजपा व आ अँड आकाश फुंडकर यांचे हस्ते भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार अँड आकाश फुंडकर यांनी पालखीतील वारकरी, टाळकरी यांचे सह श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. मुक्कामानंतर आज पहाटे पालखी शेगाव लां प्रस्थान झाली. सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांनी खामगाव शेगाव भक्ती वारी केली . या सर्व भाविक भक्तांचे तसेच पालखी व पालखीतील वारकऱ्यांचे भव्य स्वागत भाजपच्या वतीने करण्यात आले.
खामगांव शेगाव मार्गावरील जयपुर लांडे येथील पुलावरून पालखी , वारकरी आणि सोबत असलेले भक्तगण यांचेवर गण गण गणात बोते च्या गजरात आ अँड आकाश फुंडकर यांनी पुष्प वृष्टी केली. त्यांचेसह भाजप तालुकाध्य्ष विलास काळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राज पाटील विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष प्रतीक मुंडे, संदीप महाराज जोशी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक रोहन जयस्वाल, अभिलाष मोरे, मयूर घाडगे, विक्की हत्तेल, रोमित जावकार, रितेश मोदी, पवन डिक्कर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.