मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराने आपली उमेदवारी दाखल करण्याची योजना बनविली आहे. सिद्धार्थ तायडे असे या उमेदवाराचे नाव असून ते सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी आहेत. सोबतच उद्योजक म्हणूनही तालुक्यात नावलौकिक आहेत त्यांनी मागील निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवारासाठी चांगली मेहनत केली होती. मात्र एकाच पक्षाचे दोन गट झाल्याने सिद्धार्थ तायडे हे अजित पवार गटात सामील झाले होते.
राज्यात अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी आणि राज ठाकरे यांचं प्रकरण पेट धरत असताना अकोला जिल्ह्यात सर्वच पक्षाचे भावी आमदारही उमेदवारीसाठी कामाला लागले आहे. यातच तर महायुतीचा भाग असलेले अजित पवार यांची कार्यकर्तेही निवडणुकीच्या कामाला लागले आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हा एससी राखीव असल्याने या मतदारसंघावर जिल्ह्यातील अनेक अनुसूचित जातीच्या उमेदवारांची नजर आहे. अशातच मूर्तिजापूर येथील स्थानिक असलेले सिद्धार्थ तायडे हे उमेदवारी दाखल करणार असल्याचे समजते तर मूर्तिजापूर मतदार संघ हा गेल्या पंधरा वर्षापासून भाजप वर्चस्व असून हरीश पिंपळे हे तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत तर यंदा या मतदार संघात भाजपकडून बदल होणार असल्याचे संकेत आहेत त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष आपली दावेदारी या मतदार संघात दाखल करणार आहे.
पंधरा वर्षांपूर्वी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता, राष्ट्रवादी काँग्रेस कडून तुकाराम भाऊ बिडकर हे या मतदारसंघाचे आमदार होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ काबीज करता आला नाही. मात्र महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत घेतलेले आघाडी त्यामुळे अनेकांचा कल हा महाविकास आघाडीकडे झुकत चालला असल्याने भावी उमेदवारांची गर्दी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जास्त प्रमाणात आहे. मात्र अजित पवार यांच्या गटाकडून एकही उमेदवाराचे नाव पुढे आले नसल्याने आज अचानक सिद्धार्थ तायडे याचं नाव समोर आले. मूर्तिजापूर राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष जगदीश मारोटकर यांची महाव्हाईसने संपर्क साधला असता त्यांनी आपण या मतदारसंघात आपल्या पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार आहोत असे सांगितले आहे. अकोला जिल्हा हा भाजपचा गड असल्याने भावी उमेदवार येथे गर्दी करत आहे तर अजित पवार गटाकडून मूर्तिजापूर मतदारसंघासाठी सिद्धार्थ तायडे यांची वर्णी लागू शकते काय? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे…