Monday, December 23, 2024
Homeराजकीयसांगली शहर भाजपा वतीने अजित पवारांच्या निषेधार्थ आंदोलन...

सांगली शहर भाजपा वतीने अजित पवारांच्या निषेधार्थ आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते असे बेताल व्यक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. पवार कुटुंबीयाकडून नेहमीच समाजात विष पेरण्याचे काम केले जाते. याचा संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. यापुढे अशी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांनी दिला. अजित पवारांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. यावेळी म्हणाले, शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे छत्रपती संभाजी महाराज हे थोर पुरुष होते. देव, धर्म, आणि देशाचे रक्षण करणारे धर्मवीर होते. थोर पुरुषांबद्दल बोलताना अजित पवार यांनी जिभेवर भान ठेवायला हवे. पवार कुटुंबियांकडून कायमच समाजात अशी विष पेरणारे वक्तव्य केली जातात.

याचा भारतीय जनता पक्षाकडून निषेध करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघितला तर छत्रपती संभाजी महाराजांनी एकही लढाई हरलेली नाही. अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध बोलणे चुकीचे आहे. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीता केळकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन व्हनखंडे, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी,

समाजकल्याण सभापती अनिता व्हनखंडे, नगरसेवक पांडुरंग कोरे, संजय यमगर, सुब्रावतात्या मद्रासी, संजय कुलकर्णी, रणजीत सावर्डेकर, नगरसेविका कल्पना कोळेकर, लक्ष्मी सरगर, अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस अशरफ वांकर, युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर व्हनखंडे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष शहनवाज सौदागर, रघुनाथ सरगर,

सुरज पवार, अविनाश मोहिते, ज्योती कांबळे, वैशाली शेळके, धनेश कातगडे, अशोक पवार, संभाजी सलगर, उदय मुळे, महेश सगरे, रोहित नलवडे, दिगंबर जाधव, प्रियानंद कांबळे, गणपती साळुंखे, भालचंद साठे, निलेश निकम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: