सांगली प्रतिनिधी — ज्योती मोरे
मार्च 2017 ते नोव्हेंबर 2020 या दरम्यान शेतकऱ्यांच्या नावाने माल ठेवून त्यांच्या नावावर बँक ऑफ बडोदा च्या मिरज शाखेतून तारण माल कर्ज घेऊन माल परस्पर विक्री करत शेतकऱ्यांच्या नावाने काढलेले कर्ज थकीत ठेवल्याबद्दल आणि कराराचा भंग करत बँक ऑफ बडोदा बँकेची 16 कोटी 97 लाखांची आर्थिक फसवणूक केल्या बाबत ,सी एन एक्स कंपनीचा एरिया मॅनेजर अजित जाधव याच्या विरोधात 21 11 2020 रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील प्रमुख अजित जाधव यास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली कडून अटक करण्यात आले आहे. त्या न्यायालयात हजर केले असता 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, पोलीस हवालदार अमोल लोहार, पोलीस हवालदार इरफान पखाली, पोलीस हवालदार उदय घाडगे, पोलीस नाईक विनोद कदम ,पोलीस नाईक किरण रणखांबे यांनी केली आहे.