Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingहवाईयन एअरलाइन्समध्ये एअर टर्ब्युलेन्स वाढल्याने ११ प्रवासी गंभीर जखमी...

हवाईयन एअरलाइन्समध्ये एअर टर्ब्युलेन्स वाढल्याने ११ प्रवासी गंभीर जखमी…

न्युज डेस्क – फिनिक्सहून होनोलुलूला जाणाऱ्या हवाईयन एअरलाइन्सच्या विमानाला अचानक हवेचा गोंधळ वाढल्याने त्याचा फटका बसला. त्यामुळे विमानातील 36 प्रवासी जखमी झाले. यामध्ये 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. विमान होनोलुलुहून 30 मिनिटांच्या अंतरावर असताना ही घटना घडली.

अकरा जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर नऊ जणांची प्रकृती स्थिर आहे, असे होनोलुलू आपत्कालीन वैद्यकीय सेवांनी सांगितले. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली.

कायली रेयेस या प्रवाशाने सांगितले की, तिच्या आईला तिचा सीटबेल्ट बांधण्याची संधीही मिळाली नाही आणि ती वरच्या छतावर कोसळली. अपघाताच्या वेळी विमानात 287 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते असे सांगण्यात आले. 13 प्रवासी आणि तीन क्रू सदस्यांना पुढील वैद्यकीय सेवेसाठी क्षेत्रीय रुग्णालयात नेण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: