अहेरी – छल्लेवाडा येथील डॉ निसार ( पप्पू ) हकीम अध्यक्ष अहेरी तालुका काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात शेकडो महिला व पुरुषांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले. यावेळी डॉ निसार ( पप्पू ) हकीम यांनी शासनाने कागदावर राबवत असलेल्या योजनाच्या विरोधात शासनाच्या तीव्र निषेध करीत अच्छे दिन आले का ?? बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला का? 15 लाख खात्यात जमा झाले का?
विदेशातून काला धन परत आला का? शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दीडपट भाव मिळाला का? असे प्रश्न उपस्थित केले. तसेच केंद्र शासन व राज्य शासनाचे भांडाफोड केले आगामी निवडणुकीत पुन्हा तुमच्याजवळ लोकप्रतिनिधी मत मागायला आल्यास आपण जनतेने लोकशाही मार्गाने प्रश्न विचारावे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जोपर्यंत प्रश्न उपस्थित करीत लोकप्रतिनिधींना सवाल करीत नाही तोपर्यंत अहेरी विधानसभा च्या विकास होणार नाही हक्कासाठी मुलांच्या भविष्यासाठी शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र नामदेव सडमेक आदिवासी सेल तालुका अध्यक्ष यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
शासनाच्या भांडाफोड निवड शासन योजना जाहीर केले त्याची प्रसिद्धी सुद्धा केली परंतु याच्या लाभ सर्वसाधारण जनतेला फायदा मिळत नाही अनेक योजना पासून ग्रामीण भागातील लोक वंचित आहे राज्याची परिस्थिती बिकट असताना युवकांच्या हाताला काम नसताना सतत राज्यात बेरोजगारी वाढत असताना सुद्धा सध्या राज्यात तीन तिघाडा काम बिघाडा शासन आपली खुर्ची वाचवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याने जनतेचा रोष या शासनावर असल्याने.
या भागातील शेतकयांवर सरकारचे लक्ष नाही ,रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे ,पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नाही ,प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रांमपंचायत चे कारभार योग्य नाही या गंभीर मुद्यावर चर्चा करण्यात आली. अहेरी तालुका काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ निसार (पप्पू ) हकीम ,मधुकर (बबलु) सडमेक,रज्जाक पठाण , नामदेव आत्राम,
रामप्रसाद मुंजामकर तसेच दुर्गेश्वर गुरुजीला,संतोष भगत ,नरेंद्र भगत ,नागेश गुजर ,रमेश गुर्जर ,शेखर कोंडा , वनकट्टी पोर्टेट ,साईनाथ पोदे ,रणजित जाधव ,पोचं अंमलवार ,नामदेव सोधारी, राजू आरकेवार ,सोमय्या राजेला देवाक झाडे,दीपक अहिरवार ,चिरंजीव भगत राहुल कोंडा, श्रीशैलम कोंडागुरला,नवीन भगत,
श्रीनिवास सोदारी, भवन लेगला ,राजेश मुंजमकर,प्रियाताई तोर्रेम, लक्ष्मी गुरनुले ,सखुबाई गुरजाला , मल्लूभाई पुतका कविता झाडे , शंकरा बाई दुर्गे , भानाक्का मदनकाकोंडा, लीना तोर्रेम , सुमन गद्दालवार ,फजित कवडे ,मल्लूबाई निकुरे ,सुनंदा मुरमाडे, कल्पना गोरला ,अश्विनी गोमासे ,सगुना गुरुजला , शिल्पा गुरुजीला ,
लक्ष्मी कोंडागोरला , श्री लक्ष्मी पेद्दी , सह्याद्री अहिलवार ,लक्ष्मी भेगडापल्ली ,नागमणी आईलवर, मल्लूभाई अलवार , पर्वता झाडे ,पोचूबाई नीरला,जयमाला लेनगुरे ,सखुबाई निकुरे या वेळी असे शेकडो महिला आणि पुरुषाने यावेळीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केले