तर तांदळी येथील शेतकऱ्यांची नाराजी
पातूर – निशांत गवई
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज १० एप्रिल सोमवार रोजी ग्राम बेलुरा खुर्द येथे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन झालेल्या नुकसान बाबत पाहणी करून आढावा घेतला ,नुकसान पाहताच तातडीने शासकीय यंत्रणेला सर्वेक्षण करण्याच्या आदेश दिले.
यावेळी शेतातील कांदा पीक,कांदा बी, टरबूज,खरबूज, लिंबू पिकाची पाहणी करून शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या आहेत..या वेळी बेलुरा शेतशिवरात शशिकांत डांगे अनंता पाटेखेडे ,सुभाष डांगे, नागेश साबे, पुंडलिक डांगे, अनंता केशवराव देशमुख, राजेंद्र देशमुख ,संजय तायडे ,अभिजीत आकोत, सुपाजी कवळकर, सुधाकर देशमुख, यावेळी सरपंच राजेश रामचंद्र भाकरे, सरपंच धम्मपाल रामचंद्र इंगळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते
तांदळी येथील दौरा रद्द, शेतकऱ्यांची नाराजी
तांदळी येथील शेतकऱ्यांची शेतातील पिकाची झालेल्या नुकसानी बाबत सांगितले असता आमच्या शेतात पाहणी करण्यासाठी या साहेब आशा आर्त हाकेने सर्व शेतकऱ्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तर यांना सांगण्यात आले.तसेच कृषी मंत्री यांनी लगेच येतो असल्याचे अस्वासन दिल्याने तांदळी एथिक शेतकरी बेलुरा फाटावर वाट पाहत बसले होते.त्यामुळे तांदळी येथील शेतकरी युवा निवृत्ती बरडे ,गोपाल भोरे,गोपाल भुंबरे,ज्ञानेश्वर डाबेराव,गोपाल घनमोडे,विठ्ठल भोरे यांच्यासह बरेच शेतकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.