पातूर – निशांत गवई
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विध्यापीठ अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला अंधारे येथील विध्यार्थ्यांनी शेतकर्यांना बोर्डो मिश्रणाबाबत माहिती दिली, तसेच बोर्डो मिश्रण तयार करण्याची योग्य प्रक्रिया त्यांना प्रात्यक्षिकासह समजावून सांगितली.
यावेळी शेतकर्यांची शंका तेथे उपस्थित विध्यार्थ्यांनी दूर केल्या. व ते कश्या पद्थीतीने व किती प्रमाणात वापरावे याबद्दल कृषी महाविध्यालयाचे विध्यार्थी कुलदीप गव्हाले, अभय गवळी, अभीषेक गावंडे, आचल गावंडे, गायत्री गावंडे यांनी शेतकर्यांना माहिती दिली.
यावेळी गावातील शेतकर्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या उपक्रमासाठी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. राम खर्डे, कार्यक्रम समन्वयक शिवकुमार राठोड़, कार्यक्रम अधिकारी प्रा . सागर भगत, विषयतज्ञ प्रा. सागर भगत यांचे मार्गदर्शन लाभले.