मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
मालेगाव खरीप हंगाम २०२४/२५ पूर्वतयारी म्हणून कृषी विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती मालेगाव च्या वतीने तालुक्यातील सर्व कृषी व्यवसायिकांचे कृषी निविष्ठा प्रशिक्षण दिनांक 13 मे रोजी मालेगाव पंचायत समिती सभागृहात संपन्न झाले.
यावेळी .मोहीम अधिकारी आकाश सी.पी.भांगडे कृषी उपसंचालक श्री.धनुडे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी श्री आकाश इंगोले. साथी पोर्टल पंचायत समिती मालेगाव कृषी अधिकारी संतोष गिरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात खरीप हंगाम 2024 25 अंतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते कृषी निविष्ठा विक्री बाबत मार्गदर्शन करून शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना दर्जेदार,
त्रुटी रहित बियाणे उपलब्ध व्हावे याकरिता क्यू आर कोड प्रमाणे पोर्टल ॲपवर संबंधित बियाणे कंपनी लॉट नंबर बियाण्याची उगम क्षमता चे प्रमाण होलसेलर व लिटेरड कडे असलेला साठा यासंबंधी नोंदणी करूनच शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बियाणे विकावे याकरिता प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी मालेगाव तालुक्यातील 50 कृषी व्यवसायिकांनी कृषी प्रशिक्षणात सहभाग घेतला तसेच गुण नियंत्रक अधिकारी आकाश इंगोले यांनी कृषी व्यवसायिकांना आपले स्टॉक बुक साठा फलक लायसन्स कॉपी सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवावे असे आवाहन केले.
तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी संतोष गिरी यांनी सर्व व्यवसायिकांनी शासनाच्या नियमाचे पालन करून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते याची विक्री करावी तसेच सोयाबीन बियाण्याची उगम क्षमता तपासूनच दर्जेदार बियाण्याची विक्री करावी असे संबोधित केले. यावेळी मालेगाव तालुका कृषी व्यवसायिक संघटना अध्यक्ष सचिव यांच्यासह सर्व कृषी विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला.