पातूर – निशांत गवई
पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या पुर्व प्राथमिकच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खराखुरा दीक्षांत समारंभ अनुभवला. पातूर मधील चिमुकल्यांचा हा दिमाखदार आगळा -वेगळा दीक्षांत समारंभ पालकांनी अनुभवला.
किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ नुकताच थाटात पार पडला. यावेळी या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, लक्ष्मी निमकाळे, प्रियंका चव्हाण आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनतर मान्यवरांचे हस्ते या विद्यार्थ्यांना पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याची पदवी बहाल करण्यात आली. यांनतर पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेच्या शिक्षकांकडे सोपविण्यात आले.
दीक्षांत समारंभाच्या वेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा या सोहळ्याचे आकर्षण ठरले होते. सोहळ्याचे प्रास्ताविक प्रियंका चव्हाण यांनी केले. संचालन श्रावणी गिऱ्हे हिने तर अमृता शेंडे हिने आभार मानले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नयना हाडके, अविनाश पाटील,नरेंद्र बोरकर, योगिता देवकर, नितु ढोणे, शानू धाडसे, शितल कवडकार, लक्ष्मी निमकाळे, प्रियंका चव्हाण, निकिता भालतिलक, प्रिती धोत्रे, तृप्ती पाचपोर, अश्विनी आवटे, हरिष सौंदळे,बजरंग भुजबटराव,रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.
सेल्फी पॉईंट बनला आकर्षण
दीक्षांत समारंभाच्या व्यासपीठावर लावण्यात आलेला सेल्फी पॉईंट सोहळ्याचा आकर्षण ठरला होता. पालकांनी सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी सेल्फी पॉईंट चा मनमुराद आनंद घेतला.