Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनवृद्ध कलाकार मानधन योजना, अर्ज कसा करायचा लक्षात घ्या...

वृद्ध कलाकार मानधन योजना, अर्ज कसा करायचा लक्षात घ्या…

गणेश तळेकर

भजनी, किर्तनी, गोंधळी, आराधी, तमाशा, साहित्यिक, गायक, वादक, कवी , लेखक अशा विविध कला क्षेत्रातील वृद्ध कलाकार, महिला, विधवा, दिव्यांग कलाकार यांनाग्रामीण भागात मासिक 2250 रुपये तर राज्य स्तरीय 2700 रु पर्यंत मासिक मानधन देणारी योजना मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजना शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येते.

या योजनेचे प्रस्ताव गट विकास अधिकारी पंचायत समितीमार्फत मागविण्यात येतात.

शासनाने याबाबत कार्यक्रम आखून दिलेला आहे. परंतु अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे सन 2022 – 23 या वर्षासाठी वृध्द कलावंताचे अर्ज स्विकारण्यात येत आहेत.
तरी वृध्द साहित्यिक व वृध्द कलावंतानी ७ एप्रिल ते ६ मे २०२३ पर्यंत सकाळी १० ते ६ या वेळेत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

सन २०२२-२३ या वर्षाकरीता राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन १९५४-५५ पासून संपूर्ण राज्यात या संचालनालयामार्फत राबविली जाते. दरवर्षी १०० च्या इष्टांकानुसार कलावंतांची निवड समिती करते. मानधन मंजूर झालेल्या कलावंतांना श्रेणी निहाय (अ श्रेणी रु.3150, ब श्रेणी रु.2700, क श्रेणी रु.2250) मानधन दरमहा सांस्कृतिक कार्य संचालालयामार्फत अदा करण्यात येते.

योजनेचे निकष

साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची कामगिरी करणारा असावा, कला व वाड्मय क्षेत्रात ज्यांनी 15 ते 20 वर्ष प्रदिर्घ काळाचा अनुभव असावा, कलाकार व साहित्यिकांचे वय 50 वर्षापेक्षा असावा. अर्धांगवायु, क्षयरोग, कृष्ठरोग, कर्करोग या रोगांनी आजारी असलेला तसेच 40 टक्यापेक्षा जास्त शारिरिक व्यंग किंवा अपघाताने 40 टक्यांपेक्षा जास्त अपंगत्वामुळे स्वत:चा व्यवसाय करु शकत नसतील, अशा साहित्यिक व कलाकारांना वयाची अट शिथील करण्यात येईल. साहित्यिक व कलावंताच्या सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न 48 हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे. विधवा किंवा परितक्त्या वृध्द साहित्यिक व कलावंतानी मान‍धन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.

ज्या व्यक्तींनी साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घातली आहे, ज्यांचे वय 50 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ज्या कलावंत/साहित्यिक यांचे उत्पन्न रु.48 हजार पेक्षा जास्त नाही, जे कलावंत / साहित्यिक अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नाही अशा साहित्यिक व कलावंतांना मानधन मिळण्यासाठी अर्ज करता येईल.

अर्ज भरण्याचे निकष व अटी पुढीलप्रमाणे आहेत.

१)वृध्द कलावंताचा परिपूर्ण भरलेला स्वाक्षरीसह अर्ज,

२)कलावंताचे कमीत कमी वय 50 वर्षा पेक्षा जास्त असावे,

३)उत्पन्नाचे प्रमाणपत्र 48 हजार पर्यत असावे,

४)जन्म तारखेचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला/वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र),
रहिवासी प्रमाणपत्र,

५)किमान 15 ते 20 वर्षापासून कला साहित्य क्षेत्रात योगदान केल्याचे पुरावे,
प्रमाणपत्र,

६)इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचे शपथपत्र नोटरी केलेले असावे

योजनेकरीता आवश्यक कागदपत्रे

वृध्द साहित्यिक व कलावंत पती किंवा पत्नीचा एकत्रीत पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेला असावा, अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोडची सांक्षाकित प्रत,

जन्मतारखेचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला. रोग किंवा अपंगत्वाबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र, इतर शासकिय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्राची प्रत, कलासंबंधी अनुभव कागदपत्रे, आधार कार्ड, अर्जदाराचे कलाक्षेत्राबाबत परिचय पत्रात वर्षनिहाय उल्लेखनीय कार्याची माहिती.

केंद्र, राज्य शासन पुरस्कार प्राप्त असल्यास तसेच सांस्कृतीक संचालनायाकडून पुरस्कार अथवा सन्मात पत्र सोबत जोडावे. साहित्य प्रकाशित झाल्याबाबतचे आवश्यक पुरावे व साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कार अर्जासोबत जोडावे. अर्जदाराने अर्जामध्ये ज्या कला क्षेत्राचा उल्लेख केला असेल त्या कलाक्षेत्रासंबंधीचे आवश्यक पुरावे, रेडिओ आकाशवाणी प्रसारमाध्यमावरील कार्यक्रमाची माहिती व त्याबाबतचे छायाचित्रे, वर्तमानपत्रे कात्रणे व कला सादरीकरणाचा उल्लेख असावा.

जनहितार्थ

(सदर माहिती लोककलावंतांपर्यंत पोहचवा)

लोककलावंत शाहीर विक्रांतसिंह सज्जनसिंह राजपूत
अध्यक्ष,
कलावंत प्रतिष्ठान.
महाराष्ट्र राज्य.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: