Monday, December 23, 2024
Homeमनोरंजन'गदर २'च्या जबरदस्त यशानंतर आता सनी देओल आणखी एका सिक्वेलमध्ये दिसणार…कोणता चित्रपट...

‘गदर २’च्या जबरदस्त यशानंतर आता सनी देओल आणखी एका सिक्वेलमध्ये दिसणार…कोणता चित्रपट असणार ते जाणून घ्या…

अभिनेता सनी देओल सध्या ‘गदर 2’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. 11 ऑगस्टला रिलीज झालेला त्याचा चित्रपट धमाल करत आहे. अवघ्या आठ दिवसांत ‘गदर 2’ ने 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय या चित्रपटाने अनेक विक्रमही केले आहेत. दरम्यान, सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तो आणखी एका प्रसिद्ध चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

लवकरच अधिकृत घोषणा होईल
2001 मध्ये ‘गदर: एक प्रेम कथा’ रिलीज झाल्यानंतर जवळपास 22 वर्षांनी, ‘गदर 2’ च्या शानदार यशानंतर सनी देओल आणखी एका फ्रेंचायझी चित्रपटासाठी तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी देओल चित्रपट निर्माता जेपी दत्तोसोबत ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार आहे. काही दिवसांपासून टीम ‘बॉर्डर 2’ वर काम करत असून येत्या आठवड्यात सीक्वलबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

स्क्रिप्टवर काम सुरू होईल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आणखी एक कथा ‘बॉर्डर 2’ साठी फायनल करण्यात आली आहे. या सिक्वलची निर्मिती जेपी दत्ता आणि त्यांची मुलगी निधी दत्ता करणार आहेत. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर लवकरच काम सुरू होण्याची शक्यता आहे.

नव्या पिढीतील कलाकारांना संधी मिळेल
‘बॉर्डर’मध्ये सनी देओलशिवाय जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, पुनीत इस्सार, कुलभूषण खरबंदा यांसारखे स्टार्स दिसले होते. पहिल्या भागापासून सनी देओलला सिक्वेलमध्ये कास्ट करण्यात आले आहे. नव्या पिढीतील उर्वरित कलाकारांना ‘बॉर्डर 2’मध्ये घेतले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: