Thursday, December 26, 2024
Homeराज्यखासदार श्यामकुमार बर्वे यांच्या दणदणीत विजयानंतर रामटेकमध्ये भव्य विजयी रॅलीचे आयोजन...

खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या दणदणीत विजयानंतर रामटेकमध्ये भव्य विजयी रॅलीचे आयोजन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या दणदणीत विजयानंतर रामटेकमध्ये भव्य विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी विरोधकांना खुले आव्हान देत म्हणाले, ज्यांनीवआमच्या डोळ्यात अश्रू आणले आहे आम्ही त्यांना सोडणार नाही.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या दणदणीत विजयानिमित्त रामटेकमध्ये भव्य विजयी रॅली काढण्यात आली, यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे रमेश कारेमोरे, माजी जि.प अध्यक्ष रश्मी बर्वे, चंद्रपाल चौकसे,

जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकडडे व महाविकास आघाडीच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत व इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या विजयी रॅलीची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली आणि या रॅलीची सांगता गांधी चौकात झाली.या जाहीर सभेत रश्मी बर्वे, रमेश कारेमोरे यांनीही विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: