न्यूज डेस्क : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात जोर धरत असून राज्यातील दोन खासदारांनी राजीनामा दिला असल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. काल एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर आणखी शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मराठा आरक्षणासाठी थेट खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तर बीडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द देखील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
तर आता कॉंग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनीही विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आमदार सुरेश वरपूडकर यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांना सुपूर्द केल्यानंतर नाना पाटोळे यांनी त्यांची समजूत काढली.
नाना पटोले यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. या अधिवेशनात आरक्षणाबाबतची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी श्री सुरेश वरपूरकर यांनी विधानसभेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. हे त्यांना पटवून सांगितले. आरक्षणाच्या विविध प्रश्नांची तड लागण्यासाठी आमदारांनी विधानसभेत आपला आवाज बुलंद करावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.