राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारने आणलेले सर्व प्रोजेक्ट बाहेर राज्यात घालविण्याचे काम हे सरकार करीत आहे, आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. काय म्हणाले?…
सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये ११८५ कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता.
महाराष्ट्रातून एका मागून एक सगळे प्रोजेक्ट इतर राज्यात चाललेले आहेत काय कारण आहे?…. आपल्या राज्यात सर्वात चांगली इन्फ्रास्ट्रक्चर पाण्याची मुबलक उपलब्धता जमिनीची उपलब्धता रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणि सेंट्रल लोकेशन नागपूरचं तरी पण आता एका मागे कंपनी बाहेर राज्यात जात आहे. फ्रान्सची कंपनी सॅफ्रन ग्रुप सुद्धा प्रोजेक्ट बाहेर घेवून जात आहे. कशाला दाखवले होते आम्हाला स्वप्न डिफेन्स एविवेशन हब बनविण्याचे.
एवढ्या सगळ्या गोष्टी असताना जर ह्या गोष्टी घडत असेल तर तुमच्या सरकारवर इतिहासामध्ये दळभद्री सरकार म्हणून ठपका लागायचाच राहिला आता तो लागेल च त्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे की आपण हे प्रोजेक्ट आपल्या ताटातला जेवण दुसऱ्याला देणार आपल्या तरुणांना बेरोजगार करणे महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही तुम्ही लक्षात ठेवा.
आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि हे सगळे प्रोजेक्ट परत आणण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे जिद्द धरली पाहिजे आणि महाराष्ट्राचे मागणी करतो…असे काँग्रेस चे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.