राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि नेतेमंडळी भावनिक झालेत. अनेक मोठ्या नेत्यांना अश्रूही अनावर झाले. यावेळी पक्षातले सर्वच नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करत असताना अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शरद पवारांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.
याबाबत शरद पवार यांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याचे मान्य केले आहे. आज दुपारीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून पक्षाच्या अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दु:ख व्यक्त करून पवार साहेबांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली होती. दरम्यान, शरद पवारांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी आंदोलक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले.